नवी दिल्ली, 27 मार्च : भारत सध्या कोरोनासोबत मोठाच लढा देतो आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे सुरू असून निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. आपल्या देशातील नागरिकांना लस देतानाच भारत आपल्या शेजारी राष्ट्रांनाही मदतीचा हात देतो आहे. (viral video) अशाच मदत मोहिमेअंतर्गत भारतानं भूतानलाही लस पुरवली आहे. भूतानमधील एका गोड मुलीचा व्हिडिओ या पार्श्वभूमीवर सध्या व्हायरल झाला आहे. या क्युट मुलीची निरागस शैली लोकांना खूप आवडते आहे. (bhutani girl viral video) हेही वाचा रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आपटला पक्षी; पुढे काय झालं पाहा VIDEO भूतानमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. खेनब येदजिन सेल्डन नावाची एक बालकलाकार या व्हिडिओत आहे. खेनबनं भारताला अतिशय गोड आणि मोहक शैलीत धन्यवाद दिले आहेत. कोव्हिडची लस पाठवल्याबद्दल हे धन्यवाद तिनं दिले आहेत. (bhutani small girl thanks India)
Khenrab! Your ‘thank you’ touches our hearts! #VaccineMaitri #indiabhutanfriensdhip. pic.twitter.com/2JOnCHVQ5a
— Ruchira Kamboj (@ruchirakamboj) March 26, 2021
या इंग्रजीतील क्लिपच्या सुरवातीला तिनं स्वतःची ओळख सांगितली आहे. त्यानंतर ती कोरोनावरची लस पाठवल्याबद्दल भारत सरकारचं आभार मानते. हेही वाचा माणसांनाही लाजवेल असं भटक्या कुत्र्यांनी केलं काम; VIDEO पाहून कराल सलाम या व्हिडिओचा शेवट तिनं शुक्रिया भारत या शब्दानं केला आहे. #VaccineMaitri च्या अंतर्गत भारतानं अनेक देशांना लस पाठवली आहे. (bhutani girl thanks India for vaccine) ट्विटरवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओला जवळपास बारा हजार लोकांनी पाहिलं आहे. नेटकऱ्यांना खेनबचा निरागसपणा, चेहऱ्यावरचे बोलके भाव आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं खूप आवडलं आहे.