इटली हा देश भूमध्य समुद्राच्या सान्निध्याने निसर्गसमृद्ध आहे. अशा रम्य प्रदेशात राहायला कुणाला नाही आवडणार. मग हा देश आमंत्रणं देऊन गावांची लोकसंख्या का वाढतोय?
इटलीत सध्या वृद्धांचीच लोकसंख्या अधिक आहे. गावांमध्ये रोडावलेली तरुणाईची संख्या हा तिथे चिंतेचा विषय आहे.
इटलीतल्या कॅलब्रिया प्रदेशातील लोकसंख्या तर खूप कमी झाली आहे. म्हणूनच सरकारने इतर देशातील लोकांना इथे स्थायिक होण्याची विशेष ऑफर दिली आहे.
या शहरात स्थायिक होण्यासाठी सरकार प्रत्येकाला 28 हजार युरो म्हणजेच सुमारे 24.76 लाख रुपये देणार आहे .
स्थायिक होण्यासाठी काही अटी मान्य कराव्या लागतील. त्यातली महत्त्वाची अट आहे वय चाळिशीच्या आत असणं.
metro.co.uk च्या वृत्तानुसार, कॅलाब्रिया प्रांताचं नागरिक होण्यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावं. अर्ज केल्यानंतर 90 दिवसात येथे शिफ्ट व्हावं लागेल अशी एक अट आहे.
कॅलाब्रिया प्रदेशातील 75 टक्के पेक्षा जास्त शहरांमध्ये सध्या 5000 हून कमी लोक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, इटलीमधील अनेक शहरांना घटत्या लोकसंख्येच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.