फक्त चॉकलेट खा आणि लाखो रुपये कमवा; तुमच्यासाठी हटके जॉबची ऑफर

फक्त चॉकलेट खा आणि लाखो रुपये कमवा; तुमच्यासाठी हटके जॉबची ऑफर

असा जॉब नेमका आहे कुठे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... मग अजिबात वेळ घालवू नका सविस्तर बातमी वाचा.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी :  खाणं कुणाला आवडत नाही. पण खाण्यासाठी एरवी आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण खाण्यासाठी कुणी तुम्हाला पैसे देत असेल तर... असं फक्त स्वप्नातच होऊ शकतं. असं तुम्ही म्हणाला. पण नाही. प्रत्यक्षात तुम्हाला फक्त खाण्यासाठी पैसे मिळत आहेत. त्यातही तुम्हाला टॉफी, कँडी किंवा चॉकलेट आवडत असेल तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. कारण हे खाण्यासाठी एक कंपनी तुम्हाला लाखो रुपये देत आहे.

कॅनडातील कँडी फनहाऊस (Candy Funhouse) कंपनीनं हा हटके जॉब ऑफर केला आहे. ही कंपनी ओंटारिओच्या सिनिसाऊगा शहरातील आहे. पण जगात तुम्ही कुठेही असाल तरी या कंपनीसाठी काम करू शकता. या कंपनीला त्यांनी बनवलेली टॉफी खाण्याासठी फुल टाइम आणि पार्ट टाइम कर्मचारी हवे आहेत.

कंपनीनं यासाठी जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार कंपनीला कँडिओलॉजिस्ट (Candyologist) पदासाठी लोक हवे आहेत. या कंपनीनं तयार केलेल्या टॉफीची चव चाखणं हे या कँडिओलॉजिस्ट काम असेल. माहितीनुसार ही नोकरी करणाऱ्याला कंपनी एका तासासाठी 47 डॉलर देणार आहे. म्हणजे तुम्ही 8 तास काम केलं तर तुम्हाला  376 डॉलर्स मिळू शकता. म्हणजे दिवसाला तुम्ही 27,447 रुपये कमवू शकता आणि महिन्याला  8,23,410 रुपयांची कमाई करू शकता. तुमचा वार्षिक पगार 98,80,920 रुपये होईल.

हे वाचा - नोकरीची मोठी संधी, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती

तुमचं काम म्हणजे तुम्हाला या कंपनीचं प्रोडक्ट टेस्ट करायचं आहे आणि यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे ते सांगायचं आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचं फ्लेव्हर वापरू शकता हेदेखील तुम्हाला सांगायचं आहे. विशेष म्हणजे जगात कुठेही असाल तरी तुम्ही हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीत जाण्यासाची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता.

हे वाचा - 80 रुपये उधारीवर सुरू झाला लिज्जत पापडाचा उद्योग; आज 800 कोटींवर उलाढाल

या नोकरीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारी आहे. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता.

Published by: Priya Lad
First published: January 26, 2021, 2:48 PM IST
Tags: jobmoney

ताज्या बातम्या