Home /News /lifestyle /

मुली 'ही 'पाच सिक्रेटस लपवतात सगळ्यांपासून....कारण माहिती आहे का?

मुली 'ही 'पाच सिक्रेटस लपवतात सगळ्यांपासून....कारण माहिती आहे का?

Girl

Girl

एकत्रित जीवनात अनेक अशा गोष्टी असतात ज्या स्त्रिया व्यक्तच करत नाहीत. कारण त्या गोष्टी आपल्या नव-याला अथवा प्रियकराला सांगताच समजाव्यात असं त्यांना वाटत असतं.

  नवी दिल्ली, 23 मार्च: स्त्रीच्या मनामध्ये (Girls Mind) काय सुरू आहे याचा ठाव खुद्द ब्रह्मदेवालाही लागू शकत नाही, असं अनेकदा गमतीनं म्हटलं जातं. पण, या गोष्टीमध्ये खरंच काही तथ्य असेल तर? मुली किंवा महिलांच्या मनातील गोष्टी जाणून घेणं खरोखर कठीण आहे का? ह्युमन सायकॉलॉजीचा (Human Psychology) विचार केला तर ही गोष्ट एकदम खरी आहे. पुरुषांच्या (Male) तुलनेत महिलांच्या (Female) मनातील गोष्टी जाणून घेणं काहीस कठीणच आहे. कारण मुली किंवा महिला सहसा आपल्या मनातील गोष्टी सर्वांना सांगत नाहीत. त्या आपल्या आवडी-निवडी फार कमी लोकांसोबत शेअर करतात. शक्यतो महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मनातच दडवून ठेवण्याची सवय बहुतेक मुलींना असते. मुलींना मोकळेपणानं बोलतं केल्यास तुम्ही त्यांचे खूप चांगेल मित्र (Friend) होऊ शकता. पण, त्यासाठी तुम्हाला अगोदर त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला मुलींच्या अशा काही गोष्टी (Secrets Of Girls) जाणून घ्याव्या लागतील, ज्या त्या कधी उघडपणे बोलत नाहीत. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपल्या हक्काचा मान-सन्मान मिळवण्यासाठी महिलांनी मोठा लढा दिलेला आहे. तरीदेखील अजूनही त्यांना म्हणावा इतका रिस्पेक्ट (Respect) मिळत नाही. रिस्पेक्ट मिळवण्यासाठी मुलींना प्रत्येकवेळी स्वत:ची योग्यता (Ability) सिद्ध करावी लागली आहे. त्यामुळे रिस्पेक्ट हा मुलींच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. जी मुलं मुलींना रिस्पेक्ट देतात, त्यांच्याशी आदरानं बोलतात, अशी मुलं त्यांना प्रचंड आवडतात. मुली स्वत:हून ही गोष्ट कधीच उघडपणे कबूल करणार नाहीत, पण एखाद्या मुलामध्ये त्या सर्वात प्रथम हाच गुण शोधतात. त्यामुळे प्रत्येक मुलीशी किंवा स्त्रीशी नेहमी आदरानं बोला. फक्त त्यांचं मन जिंकण्यासाठीच नाही तर प्रत्येक स्त्रीशी आदरानं बोलणं ही तुमची जबाबदारी समजा. IMP Tips: तुम्हीही नेहमी फेसपॅक लावता का? मग 'या' गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
  वेबएमडी वेबसाईटनुसार, मुलींना डोळ्यात डोळे घालून (Eye Contact) बोलणारी मुलं आवडतात. जेव्हा मुलं मुलींच्या डोळ्यात बघून बोलतात तेव्हा ते जास्त आत्मविश्वासपूर्ण वाटतात. मुलींना अशी कॉन्फिडन्ट (Confident) मुलं आवडतात. या व्यतिरिक्त जर एखादा मुलगा बोलताना इतरत्र पाहत असेल किंवा डोळे वटारून बोलत असेल, तर मुलींना तो अजिबात आवडत नाही.
  मुलींना सरप्राईजेस (Surprises) खूप आवडतात. अर्थात ही गोष्ट त्या कधीही उघडपणे सांगत नाहीत. तुमची मैत्रीण असो, गर्लफ्रेंड असो, बहीण असो किंवा पत्नी सर्व मुलींना सरप्राईजेस खूप आवडतात. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या मुलीसोबत चांगलं रिलेशन (Good Relation) पाहिजे असेल तर तुम्ही तिला वेळोवेळी छोटी-मोठी सरप्राइजेस देऊ शकता. बहुतेक मुलींना चांगला सेन्स ऑफ ह्युमर (Sense of Humor) असलेली मुलं आवडतात. जो आनंदी आणि उत्साही असतो अशा मुलासोबत मैत्री किंवा रिलेशन ठेवणं मुलींना आवडतं. या उलट, नेहमी आपल्या अडचणींचं (Problems) रडगाणं गाणारी मुलं, मुलींना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही नेहमी मुलींसमोर तुमच्या अडचणी मांडत असाल तर तुम्हाला तुमचा स्वभाव बदलण्याची गरज आहे. कारण कोणतीही समस्या फक्त लोकांना सांगून नाही तर त्यावर योग्य उपाय शोधून सुटते. तुम्ही हसतखेळत तुमची समस्या मुलींना सांगितली तर कदाचित त्या तुम्हाला मदतही करतील. मुलींना जजमेंटल मुलं (Judgmental Boys) अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मुलींसोबत बोलताना मुलांनी या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. सध्याच्या मुली ट्रान्झिशन फेजमध्ये (Transition Phase) आहेत. मुलींना आपल्या स्वातंत्र्याची (Freedom) आणि क्षमतांची चांगल्या प्रकारे जाणीव होत आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये चौकश्या केलेलं, अडचणी आणलेलं सहन होत नाही. तुम्ही जर मुलींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर कुठलीही मुलगी तुम्हाला सहन करू शकणार नाही. जर तुम्हाला मुलींच्या वरील सीक्रेट गोष्टी समजून घेणं शक्य झालं तर तुम्ही मुलींसोबत कुठल्याही प्रकारचं नातं सहज सांभाळू शकता.
  First published:

  Tags: Relationship tips, Save relationship

  पुढील बातम्या