मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

IMP Tips: तुम्हीही नेहमी फेसपॅक लावता का? मग 'या' गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

IMP Tips: तुम्हीही नेहमी फेसपॅक लावता का? मग 'या' गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

 हे फेसपॅक लावताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याविषयी जागरणनं काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

हे फेसपॅक लावताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याविषयी जागरणनं काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

हे फेसपॅक लावताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याविषयी जागरणनं काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

    मुंबई, 22 मार्च: आपण सुंदर, आकर्षक दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. घरगुती उपायांसह ब्युटी पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. चेहरा स्वच्छ, नितळ, सुंदर दिसावा यासाठी फेशियल करणं ही महत्त्वाची ट्रीटमेंट असते. त्याशिवाय विविध प्रकारचे फेसपॅक (disadvantages of Face pack) लावल्यानंही त्वचेचे (Face Skin) सौंदर्य खुलते. मात्र हे फेसपॅक लावताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याविषयी जागरणनं काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. फेसपॅक लावायचा असेल तर आंघोळीच्या (Bath) आधी न लावता नंतर लावावा. कारण आंघोळीमुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील रंध्रे मोकळी झालेली असतात, त्यामुळे फेसपक चांगल्याप्रकारे त्वचेत शोषला जाऊ शकतो. आणि त्वचेवर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे फेसपॅक लावायचा असेल तर शक्यतो आंघोळीनंतर लावावा. ही बातमी वाचल्यानंतर सफरचंद खरेदी करण्याअगोदर दहावेळा विचार कराल! अनेकदा फेसपॅक लावताना ब्रशचा (Brush) वापर केला जात असल्याचे दिसते, मात्र फेसपॅक हा हाताने मसाज (massage) करत लावणं अधिक फायद्याचे ठरते. यामुळे फेसपॅक त्वचेत चांगला मुरतो आणि रक्ताभिसरणही (blood Circulation) चांगले होते. त्यामुळेही चेहराही चांगला उजळतो. आपल्या स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ वापरूनही फेसपक तयार करता येतात. कोणताही फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर तो अगदी पूर्ण वाळू देऊ नये. थोडासा ओलसर असतानाच थंड किंवा कोमट पाण्यानं धुवावा. पूर्ण सुकल्यानंतर फेसपॅक धुतल्यास त्वचा कोरडी होते आणि त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात फेसपॅक लावल्यानंतर तो सुकेपर्यंतच्या (Dry)कालावधीत शक्य तो बोलू नये. त्यामुळे त्वचा सैलावते. त्यामुळे फेसपॅक लावल्यावर डोळे मिटून शांतपणे पडून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फेसपॅक धुतल्यानंतर त्वचेवर टोनर किंवा गुलाबपाणी लावणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा चमकदार दिसेल तसंच काहीही त्रास जाणवणार नाही. त्वचा खेचल्यासारखी वाटते, बारीक चुरचुरते असा त्रास होणार नाही. जेवणानंतर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात का? `या` गंभीर आजाराचे आहेत संकेत चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक प्रकारचे फेसपॅक वापरले जातात. त्यासाठी अनेक औषधी वनस्पतींची पावडर, क्रीम्स यांचा वापर केला जातो. यामुळे त्वचा घट्ट आणि चमकदार होते. मात्र फेसपक लावताना वरील टिप्सचा वापर केल्यास त्याचा जास्त फायदा होईल. प्रत्येकच जण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्नशील असतो पण सौंदर्यप्रसाधनं वापरताना आणखीही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे ही उत्पादनं विकत घेताना त्याची एक्सपायरी डेट तपासून घेणं. बाद झालेली उत्पादनं वापरणंही त्वचेसाठी घातक ठरू शकतं.
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या