मुंबई 23 ऑगस्ट : डायबेटिस (Diabetes) हा मुख्यत: धकाधकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार मानला जातो. हा आजार पूर्वी ज्येष्ठांना होत असे, मात्र गेल्या काही काळात तरुण (Youth) वर्गही या आजाराला झपाट्याने बळी जात असल्याचं दिसून आलं आहे. डायबेटिस हा एक असा आजार आहे, जो शरीराच्या सर्व अवयवांवर हळूहळू परिणाम करत जातो. या आजारामुळे व्यक्तीचं शरीर एकप्रकारे आतून खराब होत जातं. डायबेटिस झाल्याचं योग्य वेळी लक्षात आलं तर त्यावर सहज उपचार करता येतात. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला टाइप 1 डायबेटिस, टाइप 2 डायबेटिस, प्री-डायबेटिस आणि गॅस्टोइंटेस्टनल डायबेटिसची समस्या होऊ शकते. या सर्वांची लक्षणं बऱ्यापैकी सारखीच आहेत. जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते, तेव्हा तुमच्या पायांवर काही लक्षणं दिसतात. ती लक्षणं वेळीच ओळखणं आणि उपचार घेणं महत्त्वाचं आहे. शिवाय तुमच्या पायांवर अशी लक्षणं (Diabetes Symptoms) दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब ब्लड शुगर लेव्हल तपासायला हवी. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. 41 व्या वर्षी सोनालीचा मृत्यू; कशामुळे आणि किती वेळा येऊ शकतो Heart Attack? पायाच्या त्वचेची समस्या तळवे आणि पायाची बोटं यांच्यावरील त्वचेला स्पर्श केल्यावर ती कडक वाटत असेल, तर तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढली आहे, हे समजून जा. अशा परिस्थितीत तुम्ही लवकरात लवकर ब्लड शुगर लेव्हल तपासून घ्यायला हवी, नाही तर तुम्ही डायबेटिसचे बळी ठरू शकता. नखांमध्ये फंगल इन्फेक्शन जर तुम्हाला तुमच्या पायाच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) दिसत असेल तर तुम्हाला डायबेटिस होण्याचा धोका आहे. कारण यादरम्यान पायाच्या नखाचा रंग बदलतो. नखं काळी होऊ शकतात. या शिवाय ती वाकडीही होऊ शकतात. तसंच पायाला जखम झाली असेल तरीही फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. अॅथलीट फूटचा त्रास जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल, तर तुम्ही अॅथलीट फूट (Athlete foot) समस्येने त्रस्त असू शकता. अॅथलीट फूटचा त्रास इतर कोणत्याही कारणांमुळे त्रास होत असला तरी डायबेटिस हेदेखील त्या मागचं एक प्रमुख कारण आहे. या दरम्यान, तुम्हाला पायाला खाज सुटणं, लालसरपणा, त्वचा फाटणं आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. पायावर होणाऱ्या खोल जखमा जर तुमच्या पायाच्या त्वचेवर भेगा पडत असतील आणि तिथे खोल जखम असेल तर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. याला पायाचा अल्सर असं म्हणतात. अशी लक्षणं दिसू लागल्यास, रक्तातील साखरेची पातळी वेळेत तपासा. कारण हे डायबेटिसचं लक्षण आहे. पायावर सूज जर तुमचे पाय वारंवार सुजत असतील, पाय दुखत असतील, पाय वारंवार सुन्न पडत असेल तर विशेष काळजी घ्या. कारण हे डायबेटिसचं लक्षण असू शकतं. वर दिलेली ही डायबेटिसची पायांवर दिसणारी प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे तुम्हाला शरीरात डायबेटिसची काही लक्षणं जाणवली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.