जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / 41 व्या वर्षी सोनालीचा मृत्यू; कशामुळे आणि किती वेळा येऊ शकतो Heart Attack?

41 व्या वर्षी सोनालीचा मृत्यू; कशामुळे आणि किती वेळा येऊ शकतो Heart Attack?

41 व्या वर्षी सोनालीचा मृत्यू; कशामुळे आणि किती वेळा येऊ शकतो Heart Attack?

हार्ट अ‍टॅक (Heart Attack) आल्यानंतर तत्काळ उपचार मिळणं गरजेचं असतं. वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते. परंतु, हार्ट अ‍टॅक नेमका किती वेळा येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 ऑगस्ट : बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, लठ्ठपणा आणि ताण-तणावामुळे गंभीर स्वरूपाचे आजार (Disease) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकार, डायबेटिसची (Diabetes) रुग्णसंख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. हृदय (Heart) हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य महत्त्वाचं आहे. हृदयाच्या कार्यप्रणालीत लहान-मोठा कोणत्याही स्वरुपाचा अडथळा निर्माण झाला की माणसाला अस्वस्थ वाटू लागतं. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर किंवा कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयाशी संबंधित आजार होतात. या गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्या तर प्रसंगी संबंधित व्यक्तीला हार्ट अ‍टॅक (Heart Attack) अर्थात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हार्ट अ‍टॅक आल्यानंतर तत्काळ उपचार मिळणं गरजेचं असतं. वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते. परंतु, हार्ट अ‍टॅक नेमका किती वेळा येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोकांना एक किंवा दोन वेळा हार्ट अ‍टॅक येऊ शकतो. हृदयाशी संबंधित आजार असता, हार्ट अ‍टॅकचा धोका वाढतो. `ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे. का येतो हार्ट अ‍टॅक? हृदयाला होणारा रक्तप्रवाह ब्लॉक किंवा कमी झाल्यास हार्ट अ‍टॅक येतो. कोरोनरी धमन्यांमध्ये (Coronary arteries) फॅट किंवा कोलेस्टेरॉल (Cholesterol) साठल्याने रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. हार्ट अ‍टॅक हा जीवघेणा असल्याने त्याच्याशी संबंधित दिसताच तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे. हार्ट अ‍टॅक येऊ नये म्हणून काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी रोज व्यायाम (Exercise), योगा करणं आवश्यक आहे. तसंच आहारात फळं, भाज्या जास्त प्रमाणात समाविष्ट करणं गरजेचं आहे. सणासुदीच्या काळात स्वाईन फ्लूचा कहर; प्रशासन अलर्ट हृदयाचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी साखरयुक्त, गोड पदार्थ, मीठ आणि फॅट्सयुक्त पदार्थ सेवन करणं टाळावं. धूम्रपान, मद्यपान या सारख्या व्यसनांपासून दूर राहावं. त्याचबरोबर वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवणे देखील आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला कमाल तीन वेळा हार्ट अ‍टॅक येऊ शकतो. पण प्रत्येक रुग्णामध्ये हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं. बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्युटचे वरिष्ठ कन्सल्टंट आणि इंटरनॅशनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. अमर सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हार्ट अ‍टॅक हा कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला येऊ शकतो. परंतु, 45 पेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना आणि 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना हार्ट अ‍टॅक येण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे एखाद्या व्यक्तीला तीन वेळा हार्ट अ‍टॅक येऊ शकतो. परंतु, काही रुग्णांना यापेक्षा जास्त किंवा कमी वेळा हार्ट अ‍टॅक येऊ शकतो.’ कमी वयातच सोनाली यांचा Heart Attack मुळे मृत्यू; अशी लक्षणं वेळीच ओळखून उपचार घ्या काय आहेत लक्षणं? ‘हार्ट अ‍टॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. छातीत वेदना हे यापैकी प्रमुख लक्षण आहे. मळमळ आणि उलटी, अस्वस्थ वाटणं, चक्कर येणं, जबडा किंवा दातांमध्ये वेदना, श्वास घेण्यास त्रास होणं, घाम फुटणं, गॅसेस होणं ही हार्ट अ‍टॅकची प्रमुख लक्षणं आहेत. हार्ट अ‍टॅक येऊ नये, हृदयविकार (Heart Disease) जडू नयेत यासाठी आहार आणि विहार उत्तम असणं गरजेचं आहे,’ असं डॉ. सिंघल यांनी स्पष्ट केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात