नवी दिल्ली, 10 मार्च : ग्रह, नक्षत्रं आणि राशींचा मानवी जीवनावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्र (Jyotish Shastra) सांगतं. हातांवरील रेषांमधूनही भविष्याचा वेध घेता येतो, असं हस्तसामुद्रिक शास्त्राचं (Palmistry) म्हणणं आहे. हातांवरच्या रेषा, विशिष्ट चिन्हं माणसाचा स्वभाव, त्याच्या जीवनात भविष्यकाळात घडणाऱ्या घटना दर्शवतात. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, हातांवरील काही चिन्हं (Signs) आणि रेषा मोठ्या दुर्घटनांचे संकेत देणारे असतात. यापैकी फुली अर्थात क्रॉस (Cross) हे चिन्हं अशा योगांच्या अनुषंगानं महत्त्वाचं असतं. या चिन्हांमुळे संबंधित व्यक्तीला खूप संघर्ष (Struggle) करावा लागतो. तसंच जीवनात अपघात, घातपात, कारावास, गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं. या विषयीची माहिती झी न्यूज हिंदी ने दिली आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, हातावरील एखाद्या रेषेवर आणि हाताच्या उंचवट्यावर अर्थात पर्वतावर क्रॉसचं चिन्हं असणं अशुभ मानलं जातं. यामुळे व्यक्तीला जीवनात त्रास सहन करावा लागतो. एखाद्या व्यक्तीच्या हातावरील शनी (Saturn) पर्वतावर क्रॉसचं चिन्ह असेल तर, त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. एखाद्या दुर्घटनेत हे लोक गंभीररित्या जखमी होऊ शकतात. प्रसंगी त्यांचा अकाली मृत्यू संभवतो. बुध (Mercury) पर्वतावर क्रॉस असणारी व्यक्ती फसवणूक करणारी, धोका देणारी किंवा चोरही असू शकते. केतु पर्वतावर फुलीचं चिन्ह असेल तर जीवनात कौटुंबिक समस्या निर्माण होतात. हे चिन्ह हातावर असणाऱ्या व्यक्तींना जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. अशा व्यक्ती आपलं शिक्षणही पूर्ण करू शकत नाहीत. हे वाचा - शेवटी उत्तर मिळालं! महिलांना पुरुषांच्या या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, होतात वाद एखाद्या व्यक्तीच्या राहू पर्वतावर क्रॉस चिन्ह असेल तर या व्यक्तीचं तारुण्य खूप दुःखात जातं. अशा व्यक्तीला एकतर गंभीर आजार होऊ शकतो किंवा आयुष्यात मोठ्या अपयश आणि निंदेला सामोरं जावं लागतं. तसेच व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीच्या हातावरील मंगळ (Mars) पर्वतावर क्रॉस चिन्ह असेल तर त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तीला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये अशा व्यक्ती आत्महत्यादेखील करतात. हे वाचा - दाट आणि आकर्षक पापण्या हव्यात? आहारात या गोष्टींचा करा समावेश हातावर क्रॉसचं चिन्ह अशुभ मानलं जात असलं तरी गुरु (Jupiter) पर्वत यासाठी अपवाद ठरतो. गुरु पर्वतावर असं चिन्हं असेल तर व्यक्तीला त्याचं शुभ फळ मिळतं. या चिन्हामुळं व्यक्तीचं भाग्य उजाळतं आणि त्याला मोठं यश मिळतं. त्यामुळे गुरु पर्वत वगळता अन्य ग्रहांच्या पर्वतांवर म्हणजे हातावरील उंचवट्यांवर असलेल्या क्रॉस चिन्हामुळे माणसाच्या जीवनात प्रतिकूल घटना घडणार असल्याचं दिसून येतं, असं हस्तसामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक सांगतात. पण याबाबत माहिती घेताना अभ्यासू व्यक्तीकडून माहिती घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. अर्धवट माहिती घातक ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.