चेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय

चेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय

काही क्षण उन्हात घालवल्यास हा काळवंडलेपणा लगेच दिसू लागतो. पण सध्याच्या काळात पार्लर मध्ये जाऊन टॅन काढण किंवा त्यावरील ब्युटी ट्रिटमेंट्स घेण शक्य नाही. अशातच असे काही घरगुती उपाय आण करु शकतो ज्याने काही दिवसातच टॅन गायब होते.

  • Share this:

मुंबई 19 एप्रिल: सध्या गर्मीचे दिवस सुरू आहेत तर कडक उन्हाळा रोजच घाम गाळत आहे. अशा दिवसांत शरिरावर टॅन (tanning)  होणे स्वाभाविक आहे. पण याकडे दुर्लक्ष केल्यास शरिराचा उजळपणा कमी होऊन शरिर निस्तेज दिसू लागते. पण फक्त चेहऱ्याच्या टॅनिंग कडे लक्ष देऊन काहीच फायदा नाही. शरिराच्या इतर भागांवरही लक्ष दिले पाहिजे. विशेषता चेहऱ्यानंतर मानेवर फार टॅनिंगचा (neck tanning)  फरक दिसून येतो. काही क्षण उन्हात घालवल्यास हा काळवंडलेपणा लगेच दिसू लागतो. पण सध्याच्या काळात पार्लर मध्ये जाऊन टॅन काढण किंवा त्यावरील ब्युटी ट्रिटमेंट्स घेण शक्य नाही. अशातच असे काही घरगुती उपाय आण करु शकतो ज्याने काही दिवसातच टॅन गायब होते.

चंदन,गुलाब जल, कापूर

एक चमचा चंदन पावडर मध्ये  10-15  थेंब गुलाब जल मिसळून त्यात 2 चिमूट कापूर मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्ट ला माने वर लावून 20 मिनिटापर्यंत असच ठेवा. सुकल्यानंतर थोडस हाताने रगडून थंड पाण्याने धूवून टाका.

दही, हळद

मानेचं टॅन घालवण्यासाठी दही आणि हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून 15 मी तसेच ठेवा. त्यानंतर मसाज करून थंड पाण्याने धूवून टाका.

Health tips : खूप हेअर फॉल होतोय? या उपायाने होईल फायदा

बटाटा

बटाटा टॅन घालवण्यसाठी उत्तम स्त्रोत आहे. बटाटा सालीसह बारीक पेस्ट करून घ्या व ही पेस्ट मानेवर लावा. 20 मी नंतर मसाज करून थंड पाण्याने धूवून टाका.

कोरफड गर आणि गुलाब जल

कोरफड ही सौंदर्यांसाठी नेहमीच उपयुक्त ठरलेली आहे. कोरफडीचा गर काढून एक चमचा गरात 10 थेंब गुलाब जल मिसळा. ही पेस्ट मानेवर लावा व 20 मी नंतर थंड पाण्याने धूवून टाका.

बेसन, हळद, दुधाची साय

एक चमचा बेसन पिठात अर्धा चमचा हळद आणि एत चमचा दुधाची साय मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण मानेवर लावून 20 मी तसेच ठेवा. व सुकल्यानंतर हलक्या हाताने रगडून नंतर थंड पाण्याने धूवून टाका.

Published by: News Digital
First published: April 19, 2021, 1:07 PM IST

ताज्या बातम्या