मुंबई, 22 एप्रिल : कोंबडी आधी अंडं, या प्रश्नाचं नेमकं उत्तर अद्यापही सापडलेलं नाही. अंड्याशीच संबंधित आणखी एक गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे अंडं (Egg) व्हेज (Vegetarian) आहे की नॉनव्हेज? (Non Vegetarian) अंडं खाणाऱ्या व्यक्ती याचा विचार करत नाहीत. काय म्हणावं अथवा म्हणू नये याच्याशी त्यांना काही देणंघेणं नसतं. परंतु, अनेक जणांना ते जाणून घेण्याची इच्छा शांत बसू देत नाही. त्यांचा शोध सुरूच असतो. अंडं व्हेज की नॉनव्हेज याविषयी शास्त्रीय माहिती देणारं वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.
आपल्या आहारात भाज्या, कडधान्य, फळं यासोबत अंड्याचीही आवश्यकता असते. दररोज एक अंडं खाल्लं पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा अंड्यातून सहज मिळते. अंड्यातून प्रथिनं, लोह, आयोडिन, झिंक अशी आवश्यक पोषक तत्त्वंही मिळतात. त्यामुळे डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.
अंडं व्हेज की नॉनव्हेज, या प्रश्नावर अनेकांची वेगवेगळी उत्तरं तुम्ही ऐकली असतील; पण अंडं व्हेजही आहे आणि नॉनव्हेजही आहे. भागलपूरमधल्या प्रादेशिक पोल्ट्री फार्मच्या संचालिका डॉ. अंजली यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नर कोंबड्याच्या संपर्कात न येताही कोंबड्या अंडी देऊ शकतात. कोंबडीने कोंबड्याच्या संपर्कात न येता अंडं दिलं असेल, तर ते अंडं टेबल पर्पज किंवा शाकाहारी अंडं म्हणून ओळखलं जातं.
उद्या कदाचित श्वास घेणं मुश्कील होईल; वसुंधरेची काळजी प्रत्येकाची जबाबदारी
डॉ. अंजली सांगतात, की शाकाहारी आणि मांसाहारी अंड्यांतला फरक ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. त्यासाठी अंडं टेबलच्या एका खाचीत ठेवलं जातं. त्यानंतर बंद खोलीत त्या टेबलच्या खाली एक बल्ब लावला जातो. बल्बचा प्रकाश प्रत्येक अंड्याच्या खालून नेला जातो. ज्या अंड्यातून प्रकाश आरपार जाईल किंवा अंडं पूर्णपणे लाल झालेलं दिसेल, तर ते अंडं शाकाहारी आहे असं समजावं. मांसाहारी अंड्यामध्ये असं होत नाही.
अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात, म्हणून अंडं हे नॉनव्हेज आहे, असं बरेच जण मानतात. परंतु, बाजारात येणारी अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. त्यातून कधीच पिल्लं बाहेर येऊ शकत नाहीत. अशी अंडी टेबल पर्पजसाठीच जातात. कोंबडी सहा महिन्यांची झाल्यानंतर दररोज किंवा दीड दिवसाने एक अंडं देते. परंतु, त्यासाठी नर कोंबड्याशी संपर्कात येणं आवश्यक नसतं.
अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया असते. कोंबड्यांच्या पिल्लांच्या उत्पादनासाठी इन्क्वेटर हॅचरीजचा वापर केला जातो. त्यासाठी दहा कोंबड्यांमध्ये एक कोंबडा सोडला जातो. त्या पिंजऱ्यात फर्टिलाइज अंडं असेल, तर त्यामधून कोंबडीचं पिल्लू जन्म घेऊ शकतं. अशा अंड्याला नॉन-व्हेजिटेरियन अंडं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी कोंबडी नर कोंबड्याच्या संपर्कात आल्यानंतर जे अंडं देते, ते फर्टिलायझेशनद्वारे दिलेलं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.