मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शारीरिक संबंधावेळी 'या' चुका पार्टनरला नेहमीच करतात नाराज; चांगल्या नातेसंबंधासाठी वेळीच सुधारा

शारीरिक संबंधावेळी 'या' चुका पार्टनरला नेहमीच करतात नाराज; चांगल्या नातेसंबंधासाठी वेळीच सुधारा

डोअर मॅट बनू नका - जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमची उपस्थिती सतत देत राहिलात तर काही काळानंतर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्व गमावू लागाल. अशी व्यक्ती तुमच्या भावनांना तुच्छ लेखते आणि तुम्हाला गृहीत धरू लागते. त्याला वाटू लागतं की, तुम्ही रिकामे बसला आहात. तुम्हाला दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीत, दुसऱ्याचे डोअर मॅट बनणे टाळा (कुणाच्या पायाखालचं पायपुसणं बनू नका) आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

डोअर मॅट बनू नका - जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी तुमची उपस्थिती सतत देत राहिलात तर काही काळानंतर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्व गमावू लागाल. अशी व्यक्ती तुमच्या भावनांना तुच्छ लेखते आणि तुम्हाला गृहीत धरू लागते. त्याला वाटू लागतं की, तुम्ही रिकामे बसला आहात. तुम्हाला दुसरं काही काम नाही. अशा परिस्थितीत, दुसऱ्याचे डोअर मॅट बनणे टाळा (कुणाच्या पायाखालचं पायपुसणं बनू नका) आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

जेव्हा पार्टनर एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, तेव्हाच शारीरिक संबंधाचा आनंद सर्वोच्च पातळीवर पोहोचतो.

नवी दिल्ली, 04 जानेवारी : लैंगिक संबंधादरम्यान (Physical relation) अनेक पुरुष घाई करतात, त्यामुळे तुमच्या जोडीदाराला सेक्सचा पूर्ण आनंद (sexual pleasure) मिळत नाही. तुम्ही फक्त तुमचे स्वतःचे समाधान महत्त्वाचे मानत असाल, तर तुमचा पार्टनर त्यावर रागावू शकतो. असं वारंवार होत गेल्यास त्याचा वाईट परिणाम तुमच्या वैवाहिक नात्यावर होईल. पुरुषांना सेक्स दरम्यान लगेच समाधान मिळतं, पण महिला पार्टनरला समाधान मिळण्यास वेळ लागू शकतो. सतत तुम्ही तिला निराश केल्यास यामुळे स्त्रीची चिडचिड होऊ (what happens when a woman is not sexually satisfied) शकते.

सेक्स करताना जर स्त्री आपल्या जोडीदारासोबत समाधानी (sexually satisfied) असेल तर त्यामुळे दोघांना चांगला आनंद मिळतो. जेव्हा दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, तेव्हाच लैंगिक संबंधाचा आनंद सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही लैंगिक सुख मिळते, परंतु अनेकदा असे दिसून येते की पुरुष आपल्या महिला जोडीदाराला नीट समजून घेत नाहीत, ज्यामुळे स्त्रीचे लैंगिक सुख नष्ट होते. यामध्ये स्त्रिया संतापतात आणि चुकीचा निर्णयही घेऊ शकतात. त्यामुळे पुरुषांनी अशा चुका होणार नाहीत यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेऊया.

भावनिक संबंध

स्त्रिया पुरुषांपेक्षा भावनिक जोड जास्त महत्त्वाची मानतात. स्त्रीचे पुरुषासोबतचे भावनिक बंध जोपर्यंत दृढ होत नाहीत तोपर्यंत तिला लैंगिक सुखात समाधान मिळू शकत नाही. भावनिक नाते तेव्हाच चांगले होऊ शकते जेव्हा दोघे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतात आणि एकमेकांना समजून घेतात. त्यामुळे लैंगिक सुखासाठी तुमच्या स्त्री जोडीदाराशी तुमचे भावनिक नाते अधिक महत्त्वाचे असते.

शारीरीक समाधान

चित्रपट, कादंबर्‍या आणि बहुतेक सर्व पोर्नोग्राफिक चित्रपट महिलांना केवळ एक भोगवस्तू म्हणून सादर करतात. त्यामध्ये दाखवलेल्या महिला अधिक आकर्षक दाखवलेल्या असतात (यासाठी त्यांनी काही महागड्या शस्त्रक्रिया केलेल्या असतात). पुरुषांना त्याच्या जोडीदारामध्ये पोर्नोग्राफीमध्ये दर्शविलेल्या स्त्रीची प्रतिमा देखील पाहायची असते. आपल्या जोडीदाराला समजून घेण्याऐवजी पुरुष स्वत:च्या सुखासाठी घाई करतात. त्यामुळे महिलांचे लैंगिक सुख नष्ट होते. या स्थितीत पुरुषाने त्यांना त्यांच्या शरीराबद्दल सकारात्मक भावना ठेवण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

भावनोत्कटतेसाठी वेळ घ्या

कामोत्तेजनापर्यंत पोहोचण्यासाठी स्त्री आणि पुरुषाचे शरीर वेगवेगळे बनले आहे. महिलांना कामोत्तेजित होण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणूनच इथेही भावनिक जोड जास्त महत्त्वाची आहे. ज्या पुरुषासोबत भावनिक जोड जास्त असते त्या पुरुषाशी स्त्रिया अधिक समाधानी असतात. अनेकदा पुरुषाला असे वाटते की स्त्रीलाही कामोत्तेजना आली आहे. ही भावना स्त्रीचे लैंगिक समाधान नष्ट करते. त्यामुळे स्त्री स्वतःला एक वस्तू समजू लागते आणि नैराश्यात जाते. त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांची ही प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. तिचे समाधान करण्यासाठी वेळ द्यायला हवा.

हे वाचा - Patchy Beard: तुमच्याही दाढीचे केस नीट वाढत नाहीत का? जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय

गर्भधारणेची भीती

जेव्हा आपण असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करतो तेव्हा महिलांना त्या गर्भवती राहण्याची भीती असते. याशिवाय लैंगिक आजारांमुळेही त्या घाबरतात. या भावना स्त्रीला लैंगिक सुख मिळवू देत नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत पुरुषांनी किंवा स्त्रीने कंडोमचा वापर करणे फायदेशीर ठरते.

First published:

Tags: Couple, Lifestyle, Relationship, Sexual health, Sexual wellness