गेल्या वर्षभरात Coronavirus ने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती चांगली राहणं महत्त्वाचं आहे. Immunity साठी योगासनं हा एक चांगला पर्याय असल्याचं सिद्ध होऊ शकते. दररोज ही 6 योगासनं केलीत तर फुफ्फुसांची क्षमता सुधारते आणि आपली रोग प्रतिकार शक्तीला बळकटी मिळते.
भुजंगासन: कोरोना बाधित झाल्यास फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी काही खास योगासनं करावीत. त्यापैकी एक म्हणजे भुजंगासन. हे फुफ्फुसांना मजबूत ठेवतं आणि शरीर लवचिक करतं.
ताडासन: हे योगासन स्नायूंमध्ये लवचिकता आणतं. शरीर हलकं होऊन आराम वाटतो. या आसनामुळे शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते.