नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : कोरोनाच्या (Corona) काळात वनस्पतींचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे लक्षात आल्यानंतर लोकांनी आता घरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोपे (Plants) लावायला सुरुवात केली आहे. ज्यांच्या घरात बागा आहेत, ते विविध प्रकारची झाडे लावत आहेत. पण, ज्यांच्या घरात जागा कमी आहे, तेही आता कुंड्यांमध्ये रोपांसाठी जागा करत आहेत. जर तुम्ही तुमच्या घरात रोपं लावणार असाल तर त्यामध्ये अशा झाडं आणि रोपांचा समावेश नक्की करा, ज्यांच्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राखण्यासही उपयोग (Medicinal Plants) होईल.
आज आम्ही तुम्हाला त्या पाच प्रकारच्या औषधी वनस्पतींबद्दल सांगत आहोत. त्या घरामध्ये लावल्यानं तुमचा रोपं लावण्याचा उद्देश सफल होईल. यासोबतच तुमचं आरोग्य सुधारण्यातही ती विशेष भूमिका बजावतील. तुमच्या घरात बाग किंवा टेरेस गार्डन नसेल तरीही तुम्ही त्यांना कमी जागेत घरातील कुंडीत जागा देऊ शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
गुळवेल
घरातल्या कुंडीत रोपं लावत असाल तर गुळवेल नक्की लावा. ताप, सर्दी यांसारखे किरकोळ आजार दूर करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातही गुळवेल चांगली भूमिका बजावते. यामध्ये वृद्धत्व रोखण्याचेही (अँटी-एजिंग - anti-aging) गुणधर्म देखील आहेत. यामुळं त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात देखील मदत होते.
कोरफड
कोरफड ही एक अशी वनस्पती आहे, जी आरोग्य चांगलं राखण्यासह त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्याची क्षमता आहे. कोरफडीमध्ये दाह-विरोधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. याचं सेवन केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच हवामानबदलामुळं होणाऱ्या ताप-सर्दी आणि इतर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही दूर होतात. त्वचेत चमक आणणं, डाग दूर करणं आणि भाजल्याच्या खुणा दूर करणं अशा अनेक समस्यांवरही याचा उपयोग होतो.
हे वाचा - मृत्यू पप्पा ना अधीच दिसला होता का ? आर. आर. आबांच्या मुलीची भावनिक पोस्ट
गवती चहा
गवती चहाविषयी सर्वांना माहिती असते. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्यामुळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यासोबतच पोटाची सूज, पोट फुगणे, पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, जुलाब, उलट्या आणि पोटात मुरडा येणं यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांपासून मुक्त करण्याचं काम करते. यासोबतच डोकंदुखी, अंगदुखी आणि घसा खवखवणं यासारख्या इतर अनेक समस्या दूर करण्यातही त्याची खूप मदत होते.
पुदिना
घरात पुदिनाचं रोपटं जरूर लावा. हाही औषधी वनस्पतीच्या श्रेणीत येतो. याच्या सेवनाने शारीरिक दुर्बलता, जुलाब, आमांश, ताप, पोटाचे आजार, यकृत यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. तसंच, उन्हामुळं होणारा दाह, मुरुम, मुरुम यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यातही पुदिना चांगली भूमिका बजावतो.
हे वाचा - Anand Rathi चा ‘या’ मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, यावर्षी शेअरमध्ये 145 टक्क्यांची वाढ
तुळस
तुळस ही अशी वनस्पती आहे, जी बहुतेक घरांमध्ये आढळते. मात्र, ज्यांनी अद्याप आपल्या घरात तुळस लावलेली नाही, ते औषधी वनस्पती म्हणून तुळस लावू शकतात. तुळशीची पानं स्थूलपणा कमी करणं, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणं आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासह सर्दी, पडसं, घसा खवखवणं यासह इतर अनेक समस्या दूर करण्यातही उपयुक्त आहे. एवढंच नाही तर त्वचेसाठीही ती खूप फायदेशीर आहे. ते मुरुम, freckles आणि सुरकुत्या दूर करण्यातदेखील तुळस खूप चांगली भूमिका बजावते.
(या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayurvedic medicine, Tree, Tree plantation