Home /News /lifestyle /

1 लाख 90 हजार अक्षरांनी तयार झाला आहे जगातील सर्वात मोठा शब्द, उच्चारायला लागतात साडे तीस तास

1 लाख 90 हजार अक्षरांनी तयार झाला आहे जगातील सर्वात मोठा शब्द, उच्चारायला लागतात साडे तीस तास

हा शब्द म्हणजे माणसाच्या शरीरात आढळणाऱ्या एका विशिष्ट प्रोटीनचं नाव आहे. त्या प्रोटीनच्या नावाचं लघुरूप म्हणजे शॉर्टफॉर्म टिटिन असा आहे.

    नवी दिल्ली, 21 जून : असं म्हटलं जातं, की प्रेमात पडल्यानंतर व्यक्ती लंब्याचौड्या गोष्टी बोलू लागते. एकदा बोलायला लागलं, की अशा व्यक्तीला कायम शब्द कमीच पडतात; पण आज आपण अशा एका शब्दाबद्दल पाहू या, की तो शब्द उच्चारण्यासाठी अनेक घटनांबद्दल बोलायला लागतो त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो. होय, हे खरं आहे. तसं पाहायला गेलं, तर हा आहे केवळ एकच शब्द; मात्र त्यात तब्बल एक लाख 90 हजार अक्षरं आहेत. म्हणजेच या शब्दातली अल्फाबेट्स मोजत गेलं, तर त्यात तब्बल एक लाख 90 हजार अक्षरं अर्थात लेटर्सचा (Worlds Longest Word) समावेश असल्याचं लक्षात येतं. हा शब्द जगातला सर्वांत मोठा म्हणून ओळखला जातो. ज्या शब्दाबद्दल ही चर्चा सुरू आहे, तो शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्या-चालण्यात वापरला जात असणं अशक्य आहे. ते एका केमिकलचं नाव असून, त्यात एक लाख 90 हजार अक्षरं (1 Lakh 90 Thousand Letters) आहेत. हा एक शब्द बोलण्यासाठी किती वेळ लागतो माहिती आहे? तब्बल साडेतीन तास... होय हे खरं आहे. म्हणजेच आपण भारतीय सिनेमाशी याची तुलना केली, तर तीन तासांचा पूर्ण लांबीचा एखादा सिनेमा संपला तरीही या शब्दाचं उच्चारण सुरूच असेल. मग असा हा वैशिष्ट्यपूर्ण शब्द कोणता आहे, याबद्दल कुतुहल निर्माण झालं असेल ना! त्याबद्दल थोडं जाणून घेऊ या. जगातला हा सर्वांत लांब शब्द इथे लिहिता येणार नाही. कारण त्याला जागा तर खूप लागेलच; पण तो वाचण्यासाठी लागणारा तुमचा वेळही आम्ही फुकट घालवू इच्छित नाही. तरी त्याविषयी जाणून मात्र नक्कीच घेऊ या. हा शब्द म्हणजे माणसाच्या शरीरात आढळणाऱ्या एका विशिष्ट प्रोटीनचं नाव आहे. त्या प्रोटीनच्या नावाचं लघुरूप म्हणजे शॉर्टफॉर्म टिटिन असा आहे. Methionylalanylthreonylserylarginylglycyl..अशी त्या प्रोटीनच्या (Protein) नावाची सुरुवात असून, पुढे ते नाव तब्बल 1 लाख 90 हजार अक्षरांसह पूर्ण होतं. एवढी प्रचंड लांबी असल्याने हा शब्द कोणत्याही डिक्शनरीतही आढळत नाही. कारण तो समाविष्ट करणं अवघड आहे. जगातल्या सर्वांत लांबीच्या शब्दांबद्दलचा विषय सुरू आहे, तर त्यात समाविष्ट होणाऱ्या शब्दांची यादी खूप मोठी आहे. इंग्लिश डिक्शनरीत समाविष्ट असलेला सर्वांत लांब शब्द आहे pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis. हा शब्द म्हणजे फुप्फुसाच्या अशा एका आजाराचं नाव आहे, जो आजार धूळ शरीरात गेल्यामुळे होतो. जगात असे आणखीही कित्येक मोठे शब्द आहेत. अर्थातच, हे शब्द कुठल्याही भाषेतले असले, तरी नेहमीच्या बोलण्यात वापरणं खूपच अवघड आहे.

    First published:

    पुढील बातम्या