जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Heart attack येण्यापूर्वी शरीरात असे बदल जाणवतात; लगेच ओळखून हॉस्पिटल गाठल्यास जीव वाचतो

Heart attack येण्यापूर्वी शरीरात असे बदल जाणवतात; लगेच ओळखून हॉस्पिटल गाठल्यास जीव वाचतो

heart attack

heart attack

हार्ट अ‍ॅटॅक येऊ नये, यासाठी आहारात बदल, पुरेसा व्यायाम, ताण-तणावाचं व्यवस्थापन आणि गरजेनुसार औषधोपचार आदी उपाय केले जातात. हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं (Heart attack Symptoms) दिसू लागतात. ती वेळीच ओळखली तर धोका टाळता येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 मार्च : हृदयविकार (Heart Disease) हा गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो. हृदयविकार होण्यामागे चुकीची जीवनशैली, योग्य आहाराचा अभाव, ताण-तणाव, लठ्ठपणा आदी कारणं सांगितली जातात. सर्वसामान्यपणे वृ्द्ध व्यक्तींमध्ये दिसणारा हा विकार अलीकडच्या काळात तरुणांमध्येही दिसून येत आहे. जगभरात दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) अनेक लोकांचा मृत्यू होतो. हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अ‍ॅटॅक येऊ नये, यासाठी आहारात बदल, पुरेसा व्यायाम, ताण-तणावाचं व्यवस्थापन आणि गरजेनुसार औषधोपचार आदी उपाय केले जातात. हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं (Heart attack Symptoms) दिसू लागतात. ती वेळीच ओळखली तर धोका टाळता येतो. हार्ट अटॅक येण्याअगोदर बहुतांश अशी लक्षणं दिसतात छातीत दुखणे, दाब आणि अस्वस्थता या गोष्टी काहीवेळा हृदयविकाराच्या झटक्यामध्ये तीव्र स्वरुपात जाणवतात, या लक्षणांवर आपण ओळखू शकतो. काहींच्या छातीच्या मध्यभागी फक्त थोडी वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. यामुळे तुम्हाला थोडासा दबाव आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते. जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जी नंतर धोकादायक बनतात. हे वाचा -  उन्हाळ्यात काखेतून दुर्गंधी येण्याचा त्रास वाढतो; या उपायांनी करता येईल कंट्रोल जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक चक्कर येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला छातीत दुखण्यासोबत किंवा त्याशिवाय श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि हे हृदयविकाराचे सामान्य लक्षण आहे. तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेशुद्ध होऊ शकता. थंड घाम येणं, मळमळणे ही देखील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असू शकतात. तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटत असल्यास हृदयविकाराचा झटका टाळण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे तुमच्या हृदयाची तपासणी करणे. हे वाचा -  उन्हाळ्यात अपचन-अॅसिडिटी होणारच नाही, या गोष्टी आहारात घ्यायला विसरू नका हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे लवकर ध्यानात आल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अस्वस्थ वाटणं, छातीत अस्वस्थता, छातीत जडपणा, छातीत दुखणे, घाम येणे, धाप लागणे यांचा समावेश होतो. याशिवाय काहींना अॅसिडीटी किंवा ढेकर येण्याचा प्रकारही होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात