नवी दिल्ली, 24 डिसेंबर : जीवनात प्रत्येकाला जोडीदाराची गरज भासते. कारण त्याशिवाय जीवनाची वाटचाल सुखकर होत नाही. तुर्कीमधले (Turkey) सुलतान कोसेन (Sultan Kosen) हेदेखील असेच आपल्या जोडीदाराच्या (Soulmate) शोधात आहेत. त्यांची उंची आहे 8 फूट 4 इंच. आपल्याला अनुरूप जोडीदार मिळावा, यासाठी ते दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. तसंच, आता आपल्या मातृभूमीपासून हजारो मैल दूरच्या देशात, रशियात (Russia) येऊन ते आपल्यासाठी वधूसंशोधन करत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे त्यांचं यापूर्वीही लग्न झालेलं आहे. सध्या 39 वर्षांचे असलेले सुलतान आधी एका सीरियन महिलेशी (Syrian Woman) विवाहबद्ध झाले होते. तो विवाह काही वर्षं टिकला. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यामुळे आता ते पुन्हा वधूसंशोधनात गर्क झाले आहेत. त्यांना आपल्या उंचीला आणि एकंदरीतच साजेशी वधू पाहिजे आहे.
सुलतान कोसेन शेतकरी आहेत. आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्या मुलांचं संगोपन करण्यास तयार असेल, अशी बायको त्यांना हवी आहे. आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. 2013 साली त्यांनी एका सीरियन महिलेशी विवाह केला होता. तिची उंची पाच फूट 9 इंच होती. ती सुलतान यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. सुलतान टर्किश भाषेत बोलतात, तर त्यांची पहिली पत्नी अरबी भाषेत बोलायची. त्यामुळे ते दोघं एकमेकांशी संवादच साधू शकायचे नाहीत, ही त्यांची मोठी अडचण होती. तरीही त्यांचा विवाह अनेक वर्षं टिकला आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता ते पुन्हा एकदा वधू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते रशियात आले आहेत.
हे ही वाचा-Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी 'प्रेग्नंट' व्हायची महिला
तुर्कीमध्ये मॅड्रिन येथे जन्मलेल्या सुलतान यांच्या पिच्युटरी ग्रंथीमध्ये (Pituitary Gland) ट्यूमर आहे. त्यामुळे ग्रोथ हॉर्मोन (Growth Hormone) अर्थात वाढीसाठी आवश्यक असलेलं संप्रेरक त्यांच्या ग्रंथीतून स्रवण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यांची उंची 8 फूट 3 इंच एवढी झाली आहे. एवढी उंची असल्याने गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांचं नाव जगातली सर्वांत उंच व्यक्ती म्हणून नोंद झालं आहे. हा सन्मान मिळाला असला, तरी आपली उंची आपल्यासाठी अनेकदा अडचणी निर्माण करते, असं सुलतान यांचं म्हणणं आहे. त्यातलीच एक अडचण म्हणजे त्यांना अनुरूप पत्नी मिळणं कठीण आहे. रशियन मुली विश्वासार्ह असतात, असं त्यांना कळलं. म्हणून ते आता नवऱ्या मुलीच्या शोधार्थ रशियात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.