OMG! Whale च्या उलटीनं बनवलं करोडपती! 25 कोटींचा खजिना मच्छिमाराच्या हाती

OMG! Whale च्या उलटीनं बनवलं करोडपती! 25 कोटींचा खजिना मच्छिमाराच्या हाती

व्हेलच्या उलटीमुळे (whale vomit) मच्छिमाराचं नशीबच फळफळलं आहे.

  • Share this:

बँकॉक, 03 डिसेंबर :  उलटी शब्द जरी ऐकला तरी तोंड विचित्र होतं. मात्र हीच उलटी (vomit) तुम्हाला करोडपती बनवणार असेल तर. अशाच उलटीमुळे थायलंडमधील एक व्यक्ती करोडपती झाला आहे. थालयंडमधील (thailand) एका मच्छिमाराच्या (fisherman) हाती व्हेल माशाची (whale) उलटी लागली आहे. यामुळे तो तो करोडपती झाला आहे.

अनेकदा आयुष्यात आपल्याला अपेक्षेपेक्षा अधिक मिळते. आशा काही घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. थायलंडमधील मच्छिमाराच्या बाबतीतही असंच घडलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, नारीस नावाच्या या मच्छीमाराला व्हेल माशाची उलटी (whale vomit) सापडली आहे. याची किंमत जवळपास 24 लाख पाउंड म्हणजेच 25 कोटी रुपये इतकी आहे.

व्हेल माशाच्या आतड्यामधून तो न पचवू शकणारा पदार्थ बाहेर टाकतो. अनेकजण याला माशाची उलटी म्हणतात तर अनेकजण याला माशाची विष्टा म्हणतात. अनेकदा हा पदार्थ माशाच्या मागील भागातून बाहेर पडतो.  तो मोठा असेल तर मासा याला तोंडावाटे देखील बाहेर टाकतो. वैज्ञानिक भाषेत या माशाच्या उलटीला एम्बरग्रीस (ambergris) म्हणतात. जो दगडासारखा दिसतो. व्हेल मासा समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहत असल्याने त्याच्या पोटातून बाहेर पडणारा हा पदार्थ समुद्रकिनाऱ्यावर येण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो.

हे वाचा - जिवंत प्राणी मारून नव्हे, प्रयोगशाळेतच तयार होतंय मांस; विक्रीही सुरू

नारिसला सापडलेला एम्बरग्रीसचा तुकडा मोठा आहे. ज्याचं वजन जवळपास 100 किलो इतकं आहे. त्याला हा तुकडा आढळून आल्यानंतर त्याला माहित नव्हतं. या एम्बरग्रीसची किंमत 24 लाख पाउंड इतकी आहे. यासाठी एका बिजनेसमॅननी त्याला किलोसाठी 23,740 पाउंड देण्याचं आश्वासन दिलं आहे. या मच्छीमाराचे महिन्याचं उत्पन्न हे 500 पाउंड इतकं आहे.  जर उच्चप्रतीचे हे एम्बरग्रीस निघालं तर काही दिवसांतच तो करोडपती होणार आहे.

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 5:19 PM IST

ताज्या बातम्या