जिवंत प्राणी मारून नव्हे, प्रयोगशाळेतच तयार होतंय चिकन; जगात पहिल्यांदाच इथे मिळाली विक्रीचीही मान्यता

जिवंत प्राणी मारून नव्हे, प्रयोगशाळेतच तयार होतंय चिकन; जगात पहिल्यांदाच इथे मिळाली विक्रीचीही मान्यता

मांसाहारी आणि प्राणीप्रेमी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. जगात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत तयार झालेल्या चिकन विक्रीसाठी मान्यता दिली आहे.

  • Share this:

सिंगापूर, 3 डिसेंबर : मांसाहारी आणि प्राणीप्रेमी  लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.  सिंगापूरने नुकतीच खाद्यपदार्थांशी निगडीत असलेल्या US startup प्रयोगशाळेत तयार झालेल्या चिकन विक्रीसाठी (Lab grown chicken) मान्यता दिली आहे. अशा प्रकारे जगात पहिल्यांदाच lab grown meat ला  मान्यता असून यामुळे ग्राहकांना स्वच्छ मांस उपलब्ध होणार असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे.

सिंगापूरमधील रेस्टाॅरंटसमध्ये जेव्हा हे मांस उपलब्ध होईल, तेव्हा त्याची किंमत अन्य मांसाच्या किंमतीइतकीच असेल, असे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोश टेट्रिक यांनी सांगितले.

आरोग्य, पशु कल्याण आणि पर्यावरणीय स्थिती यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या चिकनला पर्याय देण्याची मागणी येत आहे. बियॉन्ड मीट, इम्पाॅसिबल फूड्स आणि क्वॉर्न यासारख्या वनस्पती-आधारित लोकप्रिय पर्यायांमुळे सुपरमार्केट शेल्फ आणि रेस्टाॅरंटमधील वैशिष्ट्यपूर्ण मेनू वाढत आहेत. मात्र, प्रयोगशाळेत स्वच्छ प्राण्यांच्या स्नायूंच्या पेशींपासून मांस विकसित करण्याची प्रक्रिया जादा उत्पादन खर्चामुळे प्राथमिक अवस्थेत आहे.

सिंगापूर शहराची लोकसंख्या 57 लाख असून शहराच्या एकूण खाद्यान्न गरजेच्या तुलनेत केवळ 10 टक्के उत्पादन येथे होते. परंतु, आगामी दशकात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि नवी माध्यमांच्या वापरातून अन्न उत्पादन वाढीसाठी योजना आखल्या जात आहेत.

जोश टेट्रिक म्हणाले, की सॅनफ्रॅन्सिस्को येथील फर्म याबाबत अमेरिकेतील नियमकांशी बोलणी करीत असून सिंगापूर हे आम्हाला अमेरिकेपेक्षा अधिक चांगले वाटते.

याबाबत सिंगापूर फूड एजन्सीने यास मान्यता देण्यापूर्वी प्रक्रिया, उत्पादन नियंत्रण आणि सुरक्षा चाचणीशी संबंधित डेटाचा आढावा घेतल्याचे सांगितले.

या मांसाचे उत्पादन सिंगापूरमध्ये होईल, येथेच अमेरिकेत व्यापारी तत्वावर विक्री होणाऱ्या पर्यायी मूगआधारित अंड्यांचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे, असे इट जस्टने सांगितले.

2011 मध्ये स्थापन झालेल्या इटजस्टचे हाँगकाँग येथील प्रख्यात ली का शिंग आणि सिंगापूरमधील गुंतवणूकदार टेमसेक यांनी कौतुक केले आहे. कंपनीने स्थापनेपासून 300 दशलक्ष डाॅलरपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले असून त्याचे अंदाजे मूल्य 1.2 अब्ज डाॅलर आहे. 2021 संपण्यापूर्वी कंपनीचे आॅपरेटिंग उत्पन्नाच्या पातळीवर नफा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे, असे टेट्रिक यांनी नमूद केले.

जागतिक पातळीवरील दोन डझनांहून अधिक कंपन्या पर्यायी मांसाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या विचारात असून या कंपन्या प्रयोगशाळांमध्ये मासे, कोंबड्या विकसित करण्यात बाबत चाचण्या घेत आहेत. यात बार्कलेजचे 2029 पर्यंत अंदाजपत्रक सुमारे 1 अब्ज डालर्सचे असेल. यातील काही स्पर्धक कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधत गुंतवणूकीसाठी त्यांना आकर्षित केले आहे.

अमेरिकेतील मेम्फिस मेटसने जपानच्या साॅफ्टबॅंक ग्रुप आणि टेमेसेक यांच्या नेतृत्वात करार केला असून निधी देखील उभारला आहे. बिल गेटस आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांचा या कंपनीला सबळ पाठिंबा आहे.

सिंगापूरच्या शिओक मीटसने प्रयोगशाळेत विकसित केलेली कोळंबी विक्री करणारी पहिली कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याला फिलीपिन्सच्या मोनडे निसीन कार्पचे हेनरी सोसॅंटो यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

First published: December 3, 2020, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading