मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तीच औषधं घेणं किती योग्य?

15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तीच औषधं घेणं किती योग्य?

अनेक जण पुन्हा टेस्टिंग (Corona testing) करत राहतात किंवा डॉक्टरांच्या सल्लाशिवायच आपली आहेत ती औषधं (Corona medicine) घेत राहतात.

अनेक जण पुन्हा टेस्टिंग (Corona testing) करत राहतात किंवा डॉक्टरांच्या सल्लाशिवायच आपली आहेत ती औषधं (Corona medicine) घेत राहतात.

अनेक जण पुन्हा टेस्टिंग (Corona testing) करत राहतात किंवा डॉक्टरांच्या सल्लाशिवायच आपली आहेत ती औषधं (Corona medicine) घेत राहतात.

मुंबई, 15 मे : कोरोनाची (Coronavirus) लागण होऊन दोन आठवडे उलटल्यानंतरही अनेक जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यानं (Corona positive even after 15 days) लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यातील बरेच लोक पूर्ण औषधं घेऊन आणि आयसोलेशनमध्ये राहूनही पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे हे रुग्ण भीतीपोटी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच औषधं घेत आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच औषधं (Corona medicine) घेणं धोकादायक ठरू शकतं, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

"मला कोरोना होऊन एक महिना झाला मात्र, तरीही माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मी आयसोलेशनमध्ये राहून 15 दिवसांचा औषधांचा कोर्स पूर्ण केला होता. मात्र पुन्हा पॉझिटिव्ह आल्यानंतर मी तिच औषधं पुन्हा घेतली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ती घेणं बंद केलं.", अशा एका कोरोना रुग्णाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका रुग्णाची दोन महिन्यात तब्बल पाच वेळा आरटीपीसीआर (RT-PCR test) टेस्ट पॉझिटिव्ह (positive) आली आहे.

तज्ज्ञांनी सांगितलं, सर्वसाधारणपणे 15 ते 17 दिवसांत कोरोनाबाधित व्यक्ती बरी होते आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. मात्र असं झालं नाही तर रुग्णाने घाबरून जाण्याची गरज नाही.

हे वाचा - डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन

मेडिकव्हर हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसीन कन्सल्टंट (consultant for internal medicine at Medicover Hospital) डॉ. राहुल अग्रवाल म्हणाले, "15 दिवसांनंतरही पॉझिटिव्ह आल्यास लोकांनी घाबरून जाऊ नये. यासाठी कदाचित रेसिड्युअल आरएनए इन नेझल म्युकोसा हे कारण असू शकतं किंवा कदाचित चाचणीत चुकून कोरोना पॉझिटिव्ह दाखवलं गेलं असू शकतं. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा औषधं घेण्याची गरज नाही. कारण 15 दिवस औषधं घेतल्यानंतर तुमच्या शरीरात विषाणूचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी होतो. याशिवाय जर तुम्ही स्वतःच अँटीबायोटीक्स आणि स्टेरॉईड (antibiotics and steroids) घेतच राहिलात तर तुमच्या पचन यंत्रणवेर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात."

यशोदा हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन असलेले डॉ. हरिकिशन बुरुगु  म्हणाले, "मी असे बरेच रुग्ण पाहिले जे रिटेस्टिंगसाठी येतात. मी त्यांना पुन्हा टेस्टिंगची गरज नसल्याचं सांगतो. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह येत नसल्यानं त्यांना घरातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याची भीती वाटते. कोरोनाची लागण झाल्याच्या 15 ते 17 दिवसांनंतर बाधितापासून इतरांना धोका राहत नाही, तसंच त्याला औषधं घेण्याची देखील गरज नाही"

हे वाचा - राज्यातील 'या' गावाने करून दाखवलं; 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार (national guidelines) कोरोनाची सौम्य लक्षणं (Mild Covid symptoms) असलेल्या ज्या बाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे रुग्ण त्यांना लक्षणं दिसू लागल्यानंतर 15 ते 17 दिवसांनी  बरे होऊन जातात. त्यामुळे त्यांनी पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Medicine