मुंबई, 4 जुलै : सध्याच्या काळात स्पर्धा खूप वाढली आहे. त्यातच स्थिर आयुष्य जगताना, जबाबदाऱ्या पार पाडताना कसरत करावी लागते. आपसूकच स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतात. स्वतःची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे ताणाची पातळी वाढते व त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः हृदयावर तणावामुळे गंभीर परिणाम होतो. म्हणूनच ताणमुक्त राहण्यासाठी काही उपायांचा अवलंब करणं गरजेचं असतं. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधले इंटरव्हेंशनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे यांनी त्याबाबत माहिती देणारा लेख लिहिला आहे. तणावामुळे निर्माण होणारा दाह व सूज अनेक गोष्टींसाठी कारणीभूत ठरते, असं संशोधन सांगतं. यात उच्च रक्तदाब, चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी होणं, लठ्ठपणा वाढणं या गोष्टींचा समावेश असतो. म्हणूनच तणावरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे हृदयाचं संरक्षण करता येईल. स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घेतल्या व दैनंदिन वेळापत्रकात बदल केले, तर ताणाचा नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतो.
Superfood : आठवड्यातून 4 दिवस डाळ-भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे, वेट लॉससाठीही होते मदत1. स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या काहीही झालं, तरी स्वतःकडे दुर्लक्ष करणं योग्य नसतं. आनंद वाटेल, मन शांत-समाधानी राहील याकरिता आवश्यक गोष्टींसाठी वेळ राखून ठेवा. स्वतःचे छंद जोपासा, निसर्गात काही वेळ घालवा. मेडिटेशन करा. एखादं पुस्तक वाचा. स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थी गोष्ट नसते, हे लक्षात ठेवा. ही भविष्यासाठीची बेगमी असते.
2. चांगले नातेसंबंध तुमच्या जवळच्या व्यक्तींशी चांगले, सकारात्मक नातेसंबंध जपणं, वाढवणं आणि आधार देण्यासाठी खंबीर साथ तयार करणं या बाबी ताणाची पातळी निश्चित कमी करतात. काही सामाजिक नातेसंबंध भावनिक आधार, प्रोत्साहन देतात. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. 3. ताण कमी करण्याचे उपाय ताण कमी करण्यासाठी विविध उपाय शोधा व उत्तम उपायाचा अवलंब करा. दीर्घ श्वसन, मसल रिलॅक्सेशन, योगासनं, चालण्याचा किंवा धावण्याचा नियमित व्यायाम यामुळे ताण कमी होऊ शकतो. 4. चांगली झोप घेणं शरीर व मनासाठी झोप अत्यंत गरजेची असते. झोपण्यासाठी साजेसा दिनक्रम ठेवणं, झोपण्यासाठी वातावरण तयार करणं, झोपण्याआधीचा स्क्रीन टाइम कमी करणं या गोष्टी चांगली झोप लागण्यासाठी पूरक ठरतात. यामुळे केवळ ताणच कमी होत नाही, तर स्वास्थ्यही सुधारतं. 5. हृदय चांगलं ठेवणासाठी योग्य आयुष्य जगायचं हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी चांगल्या सवयींचा समावेश जीवनशैलीत करावा. फळं, भाज्या, धान्य, लीन प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स यांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि अतिरिक्त सोडियमयुक्त पदार्थ वर्ज्य करावेत. पोहणं, सायकल चालवणं, नृत्यासारखे काही व्यायाम करावेत.
Morning Routine : 21 दिवसात केस होतील मजबूत आणि लांब, फक्त केसांना नियमित लावा ‘हा’ रसताण कमी करण्यासाठी हे प्राथमिक उपाय करता येतात. ते शक्य होत नसेल, तर तज्ज्ञांची मदत तातडीने घ्यावी. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)