धक्कादायक! कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोरोना लस (corona vaccine) घेतल्यानंतर काही तासांतच आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली.

  • Share this:

चेन्नई, 20 जानेवारी : देशभरात कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम सुरू आहे. लस घेतलेल्या काही जणांमध्ये सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. पण लस घेतल्यानंतर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा (healthcare worker) मृत्यू झाला आहे. आधी उत्तर प्रदेश आणि आता तेलंगणामध्ये लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबत समोर आली आहे.

निर्मल (Nirmal) जिल्ह्यातील कुंताला प्राथमिक आरोग्य केंद्रात 42 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला 19 जानेवारी, 2020 ला सकाळी 11.30 वाजता कोरोना लस देण्यात आली. लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर 16 तासांतच आरोग्य कर्मचाऱ्यानं आपला जीव गमावला आहे.

प्राथमिक तपासानुसार या आरोग्य कर्मचाऱ्या मृत्यू लशीमुळे झालेला नाही. पण नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

याआधी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील सरकारी रुग्णालयातही एका आरोग्य कर्मचाऱ्याचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाला होता.  लस घेतल्यानंतर 24 तासांत रविवारी त्याचा मृत्यू झाला अशा बातमी सोशल मीडियावर पसरली. हा मृत्यू लशीमुळे झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण त्याचा मृत्यू लशीमुळे नाही तर हार्ट अटॅकमुळे झाल्याचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारनं दिलं.

हे वाचा - कोरोनाविरोधात भारताचं आणखी एक शस्त्र; Nasal vaccine च्या ट्रायलला मंजुरी

काही लोकांना वॅक्सिनच्या किरकोळ समस्या दिसल्या असल्या तरी, ही सौम्य लक्षण असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोना लस घेणारे एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी सांगितलं, "लोक कोणत्याही प्रकारची औषधं घेत असतील तर त्यांना लशीमुळे काही अॅलर्जीक रिअॅक्शन होऊ शकते. शरीरात वेदना, लस घेतलेल्या शरीराच्या भागावर वेदना, सौम्य ताप असे सामान्य साइड इफेक्ट होऊ शकतात. पण 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.  लशीमुळे हार्ट अटॅक येऊ शकत नाही. देशात लशीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही"

हे वाचा - ..तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित

तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.  मोदी म्हणाले,  ''भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे. आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे"

Published by: Priya Lad
First published: January 20, 2021, 3:57 PM IST

ताज्या बातम्या