मुंबई, 6 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण आणि जागतिकीकरणामुळे आपल्या लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) बराच बदल झाला आहे. पण, आजही कुमारवयीन (Teenagers) मुलांचे रिलेशिनशिप सहज मान्य केले जात नाही. मुलांच्या रिलेशनशिपची बातमी कळाल्यानंतर अनेक कुटुंबामध्ये वादळ येते. या वादळात अगदी टोकाच्या घटना घडतात. काही वर्षांपूर्वी बेंगळुरूमध्ये एका 15 वर्षांच्या मुलीने 19 वर्षांच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून वडिलांची हत्या केली होती. त्याचं कारण तिच्या वडिलांना तिचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे पालकांना आपल्या टीनेज मुलांच्या रिलेशनशिपबद्दल कळाल्यास त्यांनी कसं वागावं आणि परिस्थिती कशी सांभाळावी, (How to Handle love relationships of teenage kids) याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. रागावल्यानं परिस्थिती बिघडते पालकांना मुलाच्या रिलेशनशिपबद्दल कळतं तेव्हा ते परिस्थिती सुधारण्याऐवजी रागवतात आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. अशा परिस्थितीत तुमची मुलं मोठी होत आहेत आणि या वयात तुम्ही त्यांना रागावून किंवा धमकावून तुमचं म्हणणं मान्य करायला लावू शकत नाही, हे पालकांनी जाणून घ्यायला हवं. पौगंडावस्थेत मुलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या परिस्थितीत मुलाने किंवा मुलीने एखाद्याकडे आकर्षित होणं ही गोष्ट फार सामान्य आणि नैसर्गिक आहे. त्यामुळे असं काही घडल्यास पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेणं आणि त्यांना प्रेमाने गोष्टी समजावून सांगणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या पाल्याने सर्व काही तुमच्याशी मोकळेपणाने शेअर करावं, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही दोघंही सोबत एकाच टीममध्ये आहात याची त्याला जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही तुमच्या मुलाशी पालक म्हणून बोलता, तेव्हा अशा परिस्थितीत तुमचं मूल तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवण्याची शक्यता असते. अनेकवेळा जेव्हा पालकांना मुलांच्या रिलेशनशिपबद्दल कळतं, तेव्हा अनेक गोष्टी त्यांच्या मनात येत असतात. जसं की, ‘हे सर्व कसं घडलं, त्याच्यात हे सर्व करण्याची हिंमत कशी आली, लोक काय म्हणतील, तुम्ही आमच्या कुटुंबाचे नाव बदनाम केलं आहे, असे अनेक विचार आणि प्रश्न पालकांच्या मनात येतात आणि मग त्यांना मुलांचा खूप राग येतो. नंतर पालक आपल्या मुलांना कंट्रोल करणं सुरू करतात, त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी ते मुलांना अनेक वेळा शिक्षा देतात. खरं तर अशा प्रकारच्या वागण्यामुळे मुलं कंट्रोलमध्ये राहत नाहीत. ही वर्तणूक करून पालक आपल्या मुलांना स्वतःपासून दूर ठेवतात, त्यामुळे पुढे मुलं पालकांपासून लपवून बऱ्याच गोष्टी करू लागतात. Life@25 : ‘आई आणि बायको खूप भांडतात; त्यांच्यातील वाद कसा सोडवू?’ परिस्थिती कशी हाताळावी? किशोरवयीन मुलं रिलेशनशिपमध्ये असताना या सर्व प्रकारात अनेक वेळा त्यांना पालकांच्या पाठिंब्याची खूप गरज असते, पण पालकांच्या रागामुळे, तुसडेपणाच्या वागणुकीमुळे मुलं पालकांपासून अंतर ठेवू लागतात. पालकांना मुलाच्या रिलेशनशिपची माहिती मिळते, तेव्हा त्यांना मुलाच्या रिलेशनशिपला मान्यता देणं खूप कठीण असतं. पण तुम्हाला परिस्थिती सांभाळून घ्यायची असेल तर अशा परिस्थितीत मुलांना पूर्णपणे नकार देण्याऐवजी तुम्ही खाली दिलेल्या काही गोष्टी करू शकता. - जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या रिलेशनशिपबद्दल काळजी वाटत असेल, तर त्याबद्दल कोणाशी तरी बोला. - सर्वात आधी तुमचं डोकं शांत करा, जेणेकरून तुम्ही शांतपणे गोष्टींचा विचार करू शकाल. - मुलांच्या रिलेशनशिपबद्दल कळाल्यानंतर मुलावर थेट रागावण्याऐवजी आपण आपल्या पार्टनरशी याबद्दल बोला, कारण ते खूप महत्वाचं आहे. सोशल मीडियावर कुणी आक्षेपार्ह कमेंट केली, धमकी दिली तर काय करायचं? मुलांच्या भावना समजून घ्या एक पालक या नात्याने मुलं वयात आल्यावर त्यांच्या शरीरात होणारे बदल समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सामान्यत: मुलं वयात येताना किंवा आल्यावर मुलाच्या शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल लोकांना सर्व काही माहिती असते, परंतु भावनिक बदलांबद्दल ते अनभिज्ञ असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलाच्या फीलिंग्स (Feelings) आणि इमोशन्स समजून घेणे महत्त्वाचे आहे. वयात येत असताना मुलांच्या डोक्यात आणि मनात अनेक बदल घडत असतात. या स्टेजवर, मुलं कधीकधी खूप भावनिक होतात. पौगंडावस्था हा एक टप्पा असतो, जेव्हा मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळं होऊन स्वतःला हवं तसं स्वच्छंदी आणि मनमोकळं जगण्याची इच्छा असते. या दरम्यान मुलं नवीन मित्र बनवतात आणि नवीन गोष्टी अनुभवू इच्छितात. त्यामुळे या टप्प्यावर पालकांनी त्यांच्याशी पालक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून वागणं महत्वाचं आहे. या स्टेजवर तुम्ही हे समजून घेणं आवश्यक आहे की तुमच्या मुलाला अजूनही वेगळ्या पद्धतीने तुमची गरज आहे. वयात येताना मुलांना अनेक हॉर्मोनल बदलांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत जर तुमचं मुल वेगळं वागत असेल किंवा वेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट होत असेल, लवकर चिडत असेल, राग करत असेल तर ते मनावर घेऊ नका. या काळात मुलांवर लक्ष ठेवा, ते काय करतायत, कुठे जातायत याची काळजी घ्या, पण हे करताना त्याची प्रायव्हसी जपा. या वयात करिअरवर फोकस; आई होण्याची आधीच करून ठेवलीय तयारी मुलांशी बोला अनेकदा पालकांना या विषयांवर मुलांशी बोलणे खूप विचित्र वाटते, परंतु तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून या विषयांवर मुलाशी मोकळेपणाने बोलणं महत्त्वाचं आहे. मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांच्याशी सर्व काही मोकळेपणाने शेअर करावं, असं वाटत असतं. त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने बोललात तर मुलंही तुमचं लक्षपूर्वक ऐकतील आणि ते तुमच्या फार जवळ आहेत, अशी फीलिंग त्यांना येईल. याशिवाय मुलांशी मोकळेपणाने समजून घेऊन बोलल्यास सर्व समस्या सुटू शकतात. त्यामुळे मुलांशी पालकांनी संवाद साधणे सर्वात महत्वाचे आहे. पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स - मुलांच्या रिलेशनशिपबद्दल कळाल्यानंतर त्याच्य़ाशी बोला, शिक्षा देऊ नका. - पालकांनी मुलांना मुलं आणि मुलींशी मैत्री करण्यास प्रेरित करायला हवं. - रोमान्स, सेक्शुअल अट्रॅक्शन याबद्दल मुलांशी बोला. तुम्हाला मुलांशी बोलताना कंफर्टेबल वाटत नसेल तर त्यांना काऊन्सलरकडे न्या. - पालकांना त्यांच्या मुलांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे मुलांच्या मित्रांना घरी बोलवून त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.