जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चहा गाळण्यासाठी वापरताय प्लास्टिकची गाळणी? तर आत्ताच थांबा, अन्यथा होऊ शकतात हे जीवघेणे आजार

चहा गाळण्यासाठी वापरताय प्लास्टिकची गाळणी? तर आत्ताच थांबा, अन्यथा होऊ शकतात हे जीवघेणे आजार

चहा गाळण्यासाठी वापरताय प्लास्टिकची गाळणी? तर आत्ताच थांबा, अन्यथा होऊ शकतात हे जीवघेणे आजार

चहा गाळण्यासाठी वापरताय प्लास्टिकची गाळणी? तर आत्ताच थांबा, अन्यथा होऊ शकतात हे जीवघेणे आजार

प्लास्टिकच्या गाळणीतून गाळून येणारी चहा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जेव्हा तुम्ही त्यात चहा गाळता तेव्हा त्यातील विषारी रसायने तुमच्या कपमध्ये जातात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये चहा गाळण्यासाठी प्लास्टिकची गाळणी वापरली जाते परंतु या प्लास्टिकच्या गाळणीतून गाळून येणारी चहा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.  कधीकधी चहाची गाळणी पुनर्नवीनीकरण केलेल्या प्लास्टिकपासून बनवले जाते. जेव्हा तुम्ही त्यात चहा गाळता तेव्हा त्यातील विषारी रसायने तुमच्या कपमध्ये जातात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. कॅन्सरचा धोका : प्लास्टिकमध्ये मेट्रोसमिन आणि बिस्फेनॉल सारखी हानिकारक रसायने आढळतात, जी आपल्या शरीरात कर्करोग पसरवण्याचे काम करतात. कर्करोग सारख्या आजाराचे निदान झाले नाही तर माणसाचा जीव देखील जाऊ शकतो. गरोदर महिलांनासाठी धोकादायक : गरोदर महिलांनी प्लास्टिकच्या गाळणीतून गाळलेला चहा चुकूनही पिऊ नये.  कारण त्यातील मायक्रोप्लास्टिक्स पोटातील बाळालाही संक्रमित करू शकते, जे त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

News18लोकमत
News18लोकमत

किडनीवर परिणाम : बऱ्याच संशोधनातून सिद्ध झाले आहे की प्लास्टिकच्या संपर्कात आलेले कोणतेही पेये पिल्याने किडनी खराब होऊ शकते. कारण त्यात आढळणाऱ्या घटकांचा मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग प्रक्रियेवर परिणाम होतो. पुरुषांमध्ये नपुंसकत्व : प्लास्टिकच्या गाळणीच्या संपर्कात आलेली चहाचे वारंवार सेवन केल्याने पुरुषांमध्ये नपुंसकत्व येऊ शकते. हे ही वाचा  : एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? पाहा सद्गुरू काय म्हणतात पचनक्रिया बिघडते : चहाच्या गाळणीतून बाहेर पडणारे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या आतड्यांचे आरोग्य बिघडवतात.  त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. मेंदूवर परिणाम : प्लास्टिकमध्ये असलेल्या घातक रसायनांचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: lifestyle , tea
  • First Published :
जाहिरात
जाहिरात