तैपई, 30 जून: जुडो (Judo), कराटे पाहूनच आपल्याला धडकी भरते. जे लोक यामध्ये डेंजर अशा कसरती करतात त्यांना दुखापत होत नाही, वेदना होत नाहीत का असा प्रश्न आपल्यालाही पडतो. याचं प्रशिक्षण घेताना सुरुवातीला त्रास होतोच. कधी कधी गंभीर दुखापतही होते. ज्युडो शिकताना झालेल्या अशाच गंभीर दुखापतीमुळे एका 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू (7 Year old boy died after judo) झाला आहे.
आपल्या मुलांनी जुडो, कराटे शिकावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. अशाच पालकांनी आपल्या मुलाला जुडो प्रशिक्षणासाठी जुडो क्लासमध्ये टाकलं. तिथं त्याला जुडो कोच जुडो शिकवत होते. ते किती सक्तीने आणि शिस्तीने वागतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अशाच प्रशिक्षकाने या चिमुकल्याला 27 वेळा जमिनीवर आपडलं. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. तब्बल 2 महिने तो कोमात होता. बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे.
हे वाचा - अन्ननलिका जाळून काढली; रिमोटची बॅटरी गिळताच तासाभराने गेला चिमुकलीचा जीव
ही घटना आहे, तैवानमधील. 7 वर्षांचा हुआंग जुडो शिकत होता. 21 एप्रिलला त्याचे कोच काही मुव्ह्स सांगत होते. त्यावेळी त्यांनी हुआंगला 27 वेळा जमिनीवर आपटलं. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला फेंग युआन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांच्या उपचारानंतर तो कोमात गेला. दोन महिने तो कोमातच होता. पण त्याला वाचवणं काही शक्य झालं नाही. त्याचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने एएफपी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार हुआंगचं ब्रेन हॅमरेज झालं होतं. त्यामुळे तो 70 दिवस कोमात होता. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्याच्या बहुतेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. अखेर त्याच्या पालकांनी त्याला लाइफ सपोर्ट सिस्टमवरून हटवण्याचा निर्णय घेतला.
हे वाचा - ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर; खरंच चिनी प्राचीन उपाचार पद्धतीने बरे होतात आजार?
स्थानिक मीडियाने कुटुंबाच्या हवाल्यानुसार सांगितलं की, हुआंग बेशुद्ध होऊन पडेपर्यंत त्याच्या कोचने त्याला आपटणं थांबवलं नाही. त्याला उलटीही झाली. त्याच्या डोक्यावर खूप मार लागला. हुआंगने कोचला थांबायला सांगितलं पण ते थांबले नाहीत. हुआंगचे काकाही तिथे होते पण ते कोचला थांबवू शकले नाहीत. त्यामुळे कोचविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, International, Parents and child, Shocking news, Small child, Taiwan, World news