जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रायव्हेट पार्टमध्ये Fungal infection ची काय आहेत कारणं? तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

प्रायव्हेट पार्टमध्ये Fungal infection ची काय आहेत कारणं? तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अनेकदा महिलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टजवळ (Causes of Fungal infection in Private Parts) खाज, जळजळ किंवा संसर्गासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही अशा समस्या असतात

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 15 फेब्रुवारी: अनेकदा महिलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टजवळ (Causes of Fungal infection in Private Parts) खाज, जळजळ किंवा संसर्गासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही अशा समस्या असतात. विशेषतः उन्हाळ्यात प्रायव्हेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शन अर्थात बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) होण्याची दाट शक्यता असते. खाज सुटणं, जळजळ होणं किंवा अन्य कोणतीही समस्या वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मेडिलिंक्सचे (नवी दिल्ली) मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं, की ‘प्रायव्हेट पार्टमध्ये होणारा कॅंडिडा (Candida) हा सर्वसामान्य बुरशीजन्य संसर्ग आहे. महिलांमध्ये हे फंगल इन्फेक्शन सर्वसामान्य आहे. त्याला Vulvo Vaginal Candidiasis असं म्हणतात. हा संसर्ग पुरुषांमध्येही दिसून येतो. Curdy Discharge, खाज सुटणं, योनीमार्गाच्या बाहेरच्या काठांवर लालसरपणा, जळजळ ही लक्षणं महिलांमध्ये दिसून येतात. जे पुरुष प्री-डायबेटिक (Pre-diabetic) किंवा डायबेटिक (Diabetic) असतात, त्यांच्यात कॅंडिडा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. यात पेनिसच्या फोरस्किनवर Curdy Layer आणि लालसरपणा दिसून येतो. हे वाचा- जर तुम्ही कोणत्याही कारणाने डिस्प्रिन औषध घेत असल्यास हे नक्की वाचा! डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितलं, ‘सामान्यपणे कॅंडिडा आपल्या शरीरावर अस्तित्वात असतो. जेव्हा प्रायव्हेट पार्टच्या पीएच व्हॅल्यूमध्ये बदल होतो, ज्या व्यक्ती प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, मधुमेह किंवा एचआयव्हीची (HIV) समस्या असते, अशा रुग्णांमध्ये कॅंडिडाचा संसर्ग सर्वसामान्यपणे दिसून येतो. हे अगदी सर्वसामान्य फंगल इन्फेक्शन मानलं जातं.’ टीनिया क्रुरिसकडं दुर्लक्ष नको टीनिया क्रुरिस (Tinea cruris) हे प्रायव्हेट पार्टमध्ये होणारं दुसऱ्या प्रकारचं सर्वसामान्य इन्फेक्शन आहे. हाही बुरशीजन्य संसर्ग असतो. यामध्ये, मांडीच्या भागात अंगठीच्या आकाराची लाल रंगाची पुरळ येते. गेल्या पाच वर्षांत या संसर्गाचे रुग्ण लक्षणीय वाढताना दिसत असून, यामागे, अ‍ॅंटी फंगल रेझिस्टन्स (Anti-fungal resistance) हे कारण आहे. दहा वर्षांपूर्वी यावर प्रभावी ठरणारी औषधं आज तितकीशी प्रभावी राहिलेली नाहीत. भारतात ही समस्या वाढण्यामागच्या कारणांबाबतही अनेकदा संशोधन करण्यात आलं आहे. रुग्ण स्वतःच्या मनाने टीनिया क्रुरिसवर उपचार करत असल्याने हा आजार वाढला आहे. एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन मनानं औषधं घेणं, कोणत्याही क्रीमचा वापर करणं यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत हा आजार वाढतो, त्यावर औषधोपचारानं तो कमी होतो, पण मुळापासून बरा होत नाही. हे वाचा- शुक्राणूपासून तुमचे गोंडस बाळ कसं येतं जन्माला? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया प्रायव्हेट पार्टमधल्या संसर्गावर उपाय प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग अर्थात इन्फेक्शनची लक्षणं दिसत असल्यास तातडीने त्वचाविकार तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य निदानामुळेच असे आजार मुळापासून बरे होतात. कारण योग्य निदानामुळे योग्य उपचार मिळतात. क्रीम अथवा तोंडाद्वारे घेण्याच्या औषधांनी यावर उपचार केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा योग्य कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे. कोर्स पूर्ण होण्याआधी औषधं बंद करू नयेत. वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल तर डॉक्टर त्यामागच्या कारणांची तपासणी करतात. यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती, मधुमेह, एचआयव्ही, झिंकच्या कमतरतेमुळं हे झालं आहे का, हे तपासलं जातं. डायबेटिस असेल आणि कॅंडिडासाठी वारंवार उपचार घेतल्यास त्यातून अपेक्षित परिणाम दिसणार नाही. यासाठी डायबेटिसवर योग्य उपचार घेतले पाहिजेत अन्यथा फंगल इन्फेक्शनवर उपचार अयशस्वी ठरतात. योग्य उपचार घेतल्यास कॅंडिडाची समस्या दूर होऊ शकते. या गोष्टींची घ्या काळजी - त्वचेवर वारंवार खाजवू नका अन्यथा प्रायव्हेट पार्टवर एक्झिमा किंवा लाल पुरळ येऊ शकतं. - महिलांनी व्हजायनल पार्टच्या स्वच्छतेकडं दुर्लक्ष करू नये. - हा भाग कोरडा ठेवण्याचा शक्य असेल तितका प्रयत्न करावा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: health
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात