नवी दिल्ली 03 जानेवारी : आपल्या आजारांवर डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार, तब्येतीनुसार ही औषधं दिली जातात. पण त्याचबरोबर विविध थेरपीही (Therapies) सांगितल्या जातात. योगामध्ये हसण्याच्या थेरपीला म्हणजेच लाफ्टर थोरपीला खूप महत्त्व दिलं जातं. आयुष्यातील अनेक समस्या या लाफ्टर थेरपीनं नष्ट होतात असं म्हटलं जातं. त्यासाठीच आता लाफ्टर थेरपीचं (Laughter Therapy) औपचारिकपणे प्रिस्क्रीप्शन दिलं जाणार आहे. ब्रिटिश कॉमेडी लेक्रर आणि कॉमेडियन अँजी बेल्चर (Angie Belcher) यांनी आरोग्य तज्ज्ञांबरोबर हा एक नवीन दृष्टिकोन विकसित केला आहे. कोणत्याही ट्रॉमा असलेल्या व्यक्तींना कॉमेडी सेशनच्या मदतीने बरे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल आणि लवकर बरं होण्यात मदत होईल असे सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारासाठी हातात घेताच झाला चमत्कार हसणं हा एक चांगला उपाय आहे आणि यामुळे लोकांचं आयुष्य अगदी बदलून जाऊ शकतं असं अँजी बेल्चर यांचं म्हणणं आहे. प्रोफेशनल कॉमिक्स चेअरमन हफ आणि जॅक कँपेबल रुग्णांना ही सेशन्स देणार आहेत असं Daily Star च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ब्रिस्टल वेलस्प्रिंग सेटलमेंट सोशिओ प्रेसक्र्बिंगवर टीमवर ही सेशन्स उपलब्ध असतील. अनेक तरुणांना कुटुंबं, क्लास किंवा अनुवंशिक समस्याही असतात. आम्ही मूळातच कॉमेडियन आहोत आणि आम्ही या रुग्णांना ही सेशन्स देऊ शकतो. अशा समस्या असणाऱ्यांच्या मेडिकल प्रिस्क्रिप्शनवर लाफ्टर सेशनसाठी लिहून देण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल असा दावा केला जात आहे. खरं तर हसणं हे सर्व रोगांवरचं उत्तम औषध, उत्तम उपाय असल्याचं मानलं जातं. आयुष्यातील काही मोठ्या घटनांनाही विनोदाच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने सादर केलं जाऊ शकतं. अशा प्रकारची सेशन्स व्यक्तीमध्ये आतूनच एक प्रकाराचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात आणि तो वाढवतात. आता याला मेडिकल प्रिस्क्रिप्शनवर लेखी स्वरुपात देण्यात येणार आहे. म्हणजेच त्याला एकप्रकारे अधिकृत स्वरुप प्राप्त होणार आहे. Haldi : अशा लोकांनी चुकूनही खाऊ नये हळद; आरोग्यावर होऊ शकतात घातक परिणाम हसण्याने आरोग्य सुधारते आणि आयुष्य वाढते (Laughter Is The Best Medicine ) असं म्हटलं जातं. आयुष्यातील नकारात्मक गोष्टींवर मात करायची असेल, दुर्घटना विसरायच्या असतील तर हसण्यासारखं औषध नाही हे खरं. आता जरी हे उपचार ब्रिटनमध्ये प्रिस्क्राइब होणार असले तरीही काही दिवसांनी भारतातील डॉक्टरही तसं प्रिस्क्रिप्शन लिहून देतील आणि लोक क्लिनिकमधूनच हसत हसत बाहेर पडतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







