जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे आणि नुकसान, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे आणि नुकसान, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

प्रेग्नन्सीमध्ये उसाचा रस पिणं सुरक्षित आहे का?

प्रेग्नन्सीमध्ये उसाचा रस पिणं सुरक्षित आहे का?

गरोदरपणात स्त्रिया जो आहार घेतात त्यावर मुलाची वाढ आणि विकास अवलंबून असते. अनेकदा गरोदर स्त्रियांना उसाच्या रसाबद्दल संभ्रम असतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जानेवारी : गरोदरपणात महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खावेसे वाटते. परंतु गरोदरपणात निरोगी राहण्यासाठी काहीही खाण्यापूर्वी त्याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. कारण गरोदरपणात स्त्रिया जो आहार घेतात त्यावर मुलाची वाढ आणि विकास अवलंबून असते. अनेकदा गरोदर स्त्रियांना उसाच्या रसाबद्दल संभ्रम असतो. परंतु गरोदरपणात उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला खूप फायदा होतो आणि तो सुरक्षित देखील मानला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात गोडाच्या लालसेवर मात करण्यासाठी उसाचा रस हा आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय आहे. उसाच्या रसामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, विरघळणारे फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे. गरोदरपणात उसाच्या रसाचे फायदे बद्धकोष्ठतेपासून आराम मॉम्स जंक्शन डॉट कॉमनुसार, बहुतेक गरोदर महिला अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असतात. उसाचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते आणि पोट देखील निरोगी राहण्यास मदत होते. उसाच्या रस प्यायल्याने पोटाशी संबंधित संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. ऊर्जा वाढवण्यास उपयुक्त गर्भधारणेदरम्यान अनेकदा शरीराची ऊर्जा खूप कमी होते. अशा परिस्थितीत एक ग्लास ताज्या उसाचा रस प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळू सकते. एक उत्तम एनर्जी बूस्टर असण्यासोबतच उसाचा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते उसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच गर्भधारणेदरम्यान सर्दी, संसर्ग आणि फ्लू यांसारख्या समस्यांशी लढतात आणि यकृताचे आरोग्य सुधारतात. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक आहे. हे कायम लक्षात ठेवा गरोदरपणात उसाचा रस पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे, परंतु तो योग्य प्रमाणात आणि मर्यादित प्रमाणातच प्यावा. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उसाचा रस खाऊ नये. गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उसाचा रस प्यावा. गरोदरपणात उसाचा रस पिताना स्वच्छतेची आणि त्यात घातल्या जाणाऱ्या इंग्रेडिएंट्सची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केवळ ताजा रस प्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात