जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; त्याकडे दुर्लक्ष धोकादायक ठरेल

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; त्याकडे दुर्लक्ष धोकादायक ठरेल

कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो - 
घरगुती लोणचेच आणि तेही मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. कारण, बाजारात मिळणारे लोणचे तयार केले जाते तेव्हा ते चवदार बनवण्यासाठी त्यात जास्त तेल आणि जास्त मसाले वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्याचे साईड इफेक्टही होऊ लागतात. लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो - घरगुती लोणचेच आणि तेही मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. कारण, बाजारात मिळणारे लोणचे तयार केले जाते तेव्हा ते चवदार बनवण्यासाठी त्यात जास्त तेल आणि जास्त मसाले वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्याचे साईड इफेक्टही होऊ लागतात. लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. या समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे, हे वेळीच जाणून घेणं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : आपण आहारात तेलकट पदार्थांचा अधिक समावेश केला तर त्याच्यामुळं शरीरात अपायकारक कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. या समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे, हे वेळीच जाणून घेणं. कोलेस्ट्रॉल म्हणजे पेशींबाहेरील एका विशेष घटकापासून बनलेला थर असतो. वैद्यकशास्त्रात याला लिपीड (Lipid) असं म्हणतात. कोलेस्ट्रॉलचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) जे शरीरासाठी अपायकारक असतं आणि दुसरं म्हणजे गुड किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) जे शरीरासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सप्रमाणे आवश्यक असतं. उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी आहे धोकादायक झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा कोलेस्टेरॉल वाढतं, तेव्हा हृदयाजवळ असलेल्या धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते आणि रक्त प्रवाहात समस्या निर्माण होतात. यामुळं हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. सकस पदार्थ खाण्याव्यतिरिक्त आपण दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. अन्यथा, कॅलरीज बर्न न झाल्यामुळं शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. कोलेस्ट्रॉल वाढलंय की नाही हे कसं ओळखावं? कोलेस्टेरॉल वाढल्याचं लिपिड प्रोफाइल ब्लड टेस्टद्वारे (Lipid Profile Blood Test) ओळखलं जातं. अँजिओग्राफीमुळं (Angiography) हृदयाच्या धमन्या किती ब्लॉक झाल्या आहेत किंवा अरुंद झाल्या आहेत, हे कळतं. मेंदूमध्ये ब्लॉकेज असेल तर मेंदूतील रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी करावी लागेल. हे वाचा -  रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा हा त्रास कसा टाळायचा? शरीरातील चरबीची वाढ थांबवायची असेल तर, हेल्दी कोलेस्ट्रॉल (Healthy cholesterol) म्हणजेच शरीरासाठी चांगलं असलेलं कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणं सुरू करा. त्याला वैद्यकीय भाषेत उच्च घनता लिपोप्रोटीन (High-density lipoprotein) किंवा एचडीएल (HDL) म्हणतात. याच्या सेवनानं हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) धोका कमी होतो. या पदार्थांमध्ये असतं खराब कोलेस्ट्रॉल - मांस उत्पादनं - लोणी - फास्ट फूड - जंक फूड - चीज - साखर हे वाचा -  jaggery and gram benefits: मूठभर चणे आणि गूळ नियमित खा; आजारी पडणं विसरून जाल चांगल्या कोलेस्ट्रॉलसाठी हे पदार्थ खा - ओट्स - बीन्स - कडधान्यं / डाळी - भेंडी - कठीण कवचाची फळं / ड्राय फ्रूटस (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात