Home /News /lifestyle /

जीवघेण्या कॅन्सरवरही आलं औषध? रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा

जीवघेण्या कॅन्सरवरही आलं औषध? रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका छोट्या क्लिनिकल ट्रायलमध्ये, 18 रुग्णांनी डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचं औषध सहा महिने घेतलं आणि त्या सर्व रुग्णांचा रेक्टल कॅन्सरचा ट्यूमर नाहीसा झालाय.

नवी दिल्ली 08 जून : कॅन्सर (Cancer) हा जीवघेणा आजार आहे. या जीवघेण्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचारांमुळे रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु यावर विशेष औषध अद्याप उपलब्ध नाही. मात्र, जग लवकरच कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून मुक्त होण्यास सक्षम असेल, असा दावा केला जात आहे. यूएसमधील मॅनहॅटन येथील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे पहिल्यांदा एका औषधाची कॅन्सर रुग्णांवर चाचणी करण्यात आली आणि हे औषध कॅन्सरचे 100% निर्मूलन करत असल्याचं या चाचणीतून दिसून आलंय. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, एका छोट्या क्लिनिकल ट्रायलमध्ये, 18 रुग्णांनी डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचं औषध सहा महिने घेतलं आणि त्या सर्व रुग्णांचा रेक्टल कॅन्सरचा ट्यूमर नाहीसा झालाय. डॉस्टारलिमॅब हे प्रयोगशाळेत तयार केलेल्या रेणूंचा समावेश असलेलं औषध आहे. ते मानवी शरीरात सब्स्टिट्युट अँटिबॉडीच्या रुपात कार्य करतात. प्रयोग करण्यात आलेल्या सर्व 18 रुग्णांना समान प्रमाणात हे औषध देण्यात आलं आणि सहा महिन्यांनंतर या सर्व रुग्णांमधील कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला. यानंतर एंडोस्कोपी, पॉझिट्रॉन एमिशन टोपोग्राफी, पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन यांसारख्या टेस्टिंगमध्येही कॅन्सर दिसून आलेला नाही. या संदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय. केंद्राचं 5 राज्यांना पत्र आणि राज्य सरकार मास्कसक्तीच्या तयारीत, देश कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर? न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डियाझ जे. म्हणाले, 'कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय.' न्यू यॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, क्लिनिकल ट्रायलमधील रूग्णांनी त्यांच्या कर्करोगाचे निर्मूलन करण्यासाठी केमोथेरपी (Chemotherapy), रेडिएशन आणि सर्जरी यासारखे उपचार केले. या उपचारांमुळे आतडी, जननेंद्रियांसंबंधी आणि इतर लैंगिक आजार होण्याची शक्यता बळावते. मात्र उपचारांसाठी दुसरा पर्याय नसल्याने कॅन्सरमधून बरं व्हावं यासाठी ते पुन्हा सर्जरी (Surgery) तसेच इतर उपचारांसाठी गेले होते. परंतु त्यांना डॉस्टारलिमॅबच्या ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी विचारण्यात आलं. ते रुग्ण कॅन्सरवरील पारंपरिक उपचारपद्धतीऐवजी डॉस्टारलिमॅब औषधाच्या ट्रायलसाठी तयार झाले आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा कॅन्सर पूर्णपणे नाहीसा झाला असून, त्यांना कोणतेही पोस्ट कॅन्सर आजार किंवा लक्षणं दिसत नाहीयेत. सहा महिन्यांनंतर या रुग्णांची पुन्हा चाचणी करण्यात आली. त्या चाचणीच्या निकालामुळे वैद्यकीय विश्वातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कॅलिफोर्निया विद्यापीठात कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉ. अॅलन पी. वेनूक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘सर्व रुग्णांमध्ये कर्करोगाचे पूर्णपणे निर्मूलन होणं अविश्वसनीय आहे. हे कॅन्सर संदर्भातील जगातील पहिलं असं संशोधन असेल, ज्यात सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झालेत.’ जगभरातील कॅन्सर रुग्णांची आकडेवारी या औषधामुळे जगभरातील असंख्य लोकांसाठी एक आशा निर्माण झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, 2020 मध्ये कॅन्सरमुळे जगभरात 1 कोटी लोकांचा मृत्यू झाला.दर सहा कॅन्सर रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होतो, इतका गंभीर हा आजार आहे. सर्वाधिक झपाट्याने स्तनांचा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरचे (Breast cancer) रुग्ण वाढत आहेत. 2020मध्ये 2.26 मिलियन ब्रेस्ट कॅन्सरचे, 2.21 मिलियन फुफ्फुसाच्या कॅन्सरचे (Lung Cancer) तर 1.93 मिलियन कोलोन आणि रेक्टम कॅन्सरचे (Colon and Rectum Cancer) रुग्ण आढळले. World Brain Tumour Day 2022: ब्रेन ट्यूमरची ही लक्षणं वेळीच ओळखणे आहे गरजेचे; धोका टाळता येतो हे औषध कसं काम करतं? चाचणीदरम्यान, सर्व रुग्णांनी सहा महिन्यांसाठी दर तीन आठवड्यांनी डॉस्टारलिमॅब घेतलं. सहभागी सर्व रुग्ण कॅन्सरच्या एकाच टप्प्यात होते. सर्वांचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात कोलोनमध्ये होता आणि कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला नव्हता. अशा औषधांना 'चेकपॉईंट इन्हिबिटर्स' म्हणतात, जी घेतलेल्या 20 टक्के पेशंटवर त्या औषधांचा विपरित परिणाम झाला. ही औषधं घेतलेल्या जवळजवळ 60 टक्के पेशंटचे स्नायू क्षीण झाले आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली; पण डॉस्टारलिमॅब औषधांचं सेवन केलेल्या रुग्णांमध्ये कोणतीही निगेटिव्ह रिअ‍ॅक्शन आलेली दिसून आली नाही. उपचारांचा खर्च किती? हे औषध भविष्यात मोठ्या प्रमाणावर वापरासाठी मंजूर झाल्यास, त्याची किंमत नक्कीच जास्त असेल. कारण या औषधाच्या प्रत्येक ट्रायल डोसची किंमत सुमारे 8.55 लाख रुपये आहे. कॅन्सरमुक्त झाल्यानंतर कशी होती रुग्णांची प्रतिक्रिया? मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील ऑन्कोलॉजिस्ट (oncologist) आणि शोधनिबंधाच्या सह-लेखिका डॉ. अँड्रिया सेर्सेक यांनी ट्रायलमधील सहभागी रुग्णांच्या प्रतिक्रियेबद्दल न्यूयॉर्क टाईम्सला माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘रुग्णांना जेव्हा कळलं की ते कॅन्सरमुक्त झाले आहेत तेव्हा त्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.' 'आणखी चाचण्या आवश्यक' नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या लाइनबर्गर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरच्या डॉ. हॅना के सॅनोफ, या अभ्यासात सहभागी नव्हत्या. त्या म्हणतात, ‘या औषधांचे परिणाम नक्कीच चांगले आहेत, परंतु ट्रायलमध्ये सहभागी रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत की नाही हे पूर्णपणे स्पष्ट नाही. त्यामुळे या औषधाच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणं आवश्यक आहेत.’
First published:

Tags: Breast cancer, Cancer

पुढील बातम्या