जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / साधा ताप म्हणून दु्र्लक्ष करू नका; फक्त कोरोनाच नाही तर असू शकतो 'हा' आजार

साधा ताप म्हणून दु्र्लक्ष करू नका; फक्त कोरोनाच नाही तर असू शकतो 'हा' आजार

साधा ताप म्हणून दु्र्लक्ष करू नका; फक्त कोरोनाच नाही तर असू शकतो 'हा' आजार

आठवडाभर ताप येत असेल आणि त्यासह इतर लक्षणं दिसत असतील तर तपासणी करून घ्या.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    टायफॉइड (typhoid) ताप हा एक संसर्गजन्य ताप आहे. हा एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीकडे वेगानं पसरतो. टायफॉइड कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये होऊ शकतो. यावर उपचार करण्यासाठी प्रतिजैविक औषधं दिली जातात जेणेकरून रुग्ण लवकरच बरा होईल. या आजारामध्ये आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणं फार महत्त्वाचं आहे. टायफॉइडच्या बाबतीत जर रुग्णानं आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. टायफॉइड रोग कशामुळे होतो आणि त्याचे उपचार काय असू शकतात ते समजून घ्या. अशाप्रकारे होतो टायफॉइडचा प्रसार टायफॉइड ताप हा दूषित पाण्यानं आंघोळ करणं, दूषित पाणी पिणं किंवा त्यापासून शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे होतो. यामध्ये सेलमोनेला टायफॉइड नावाचा एक जीवाणू आहे जो टायफॉइड ला कारणीभूत ठरतो. इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीस टायफॉइडचा संसर्ग झाला असेल तर इतर व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊन त्यास बळी पडू शकते. हवामानातील बदलांमुळे देखील टायफॉइड होऊ शकतो. टायफॉइडची लक्षणं myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते, टायफॉईडमध्ये रुग्णाला जास्त ताप येतो. हा ताप 103 ते 104 अंशांपर्यंत वाढू शकतो. टायफॉईड ताप सुमारे आठवडाभर राहतो. या रुग्णात तापाबरोबर, पोटदुखी, भूक न लागणे, डोकेदुखी, शरीराच्या अनेक भागात वेदना, अतिसार ही लक्षणे देखील आढळतात. तापात ही लक्षणे दिसल्यास रुग्णास ताबडतोब डॉक्टरांकडे नेले पाहिजे. कधीकधी एखाद्यास टायफॉईडमधून बरे होण्यासाठी 3-4 आठवडे लागू शकतात. हे आहेत उपचार टायफॉइडच्या उपचारात प्रतिजैविक मोठ्या प्रमाणात कार्य करतात, मात्र टायफॉइड ताप एक आठवड्यापर्यंत राहतो. म्हणून यावेळी रुग्णानं जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. हा ताप मुलांवर अधिक परिणाम करतो, म्हणूनच मुलांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. टायफॉइड दूषित पाणी आणि घाणीमुळे पसरत असल्यामुळे आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि केवळ स्वच्छ पाण्याचा वापर करा. या व्यतिरिक्त हे लक्षात घ्या की काहीही खाण्यापूर्वी  हात धुतले पाहिजेत कारण हातांवरही जीवाणू असतात जे अन्नामार्फत शरीरात प्रवेश करतात. इतकंच नाही तर अन्न नेहमी झाकलेले असावे याची दखल घ्या. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार, टायफॉइड जीवाणू बर्‍याच ठिकाणी उद्भवू शकतात म्हणून घराच्या प्रत्येक कोपऱ्याची साफसफाई करणंदेखील खूप महत्त्वाचं आहे. दरवाजांचे हँडल्स, टीव्ही रिमोट, मोबाईल फोन या सर्व वस्तू स्वच्छ केल्या पाहिजेत. टायफॉइडच्या रुग्णाच्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे कारण कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रुग्णाची भांडीदेखील बाजूला वेगळी ठेवली पाहिजे जेणेकरून त्याच्या भांड्यातील जीवाणू इतर भांड्यांमध्ये पसरू नयेत. रुग्णाचे कपडे आणि चादर देखील दररोज बदलली पाहिजेत. विशेषत: मुलांना टायफॉइडच्या रुग्णांपासून नेहमीच दूर ठेवले पाहिजे कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीत, लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख विषमज्वर (टायफॉइड) न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात