मुंबई, 3 ऑक्टोबर : गर्भधारणा टाळण्यासाठी बहुतांश महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. काही लोकांना या गोळ्यांचा फायदा आणि तोट्याविषयी फारशी माहिती नसते. खरं तर गर्भनिरोधक गोळ्या अनेक दृष्टीनं फायदेशीर असतात. यामुळे गर्भधारणा तर टाळता येतेच, त्यासोबत लैंगिक संक्रमित संसर्ग अर्थात एसटीआयदेखील दूर राहतो. गर्भनिरोधक गोळ्यांव्यतिरिक्त गर्भधारणा टाळण्यासाठी काँडोम, आययूडी, गर्भनिरोधक इम्प्लांट सारख्या साधनांचाही वापर करता येतो. त्यांचे फायदे तसेच तोटेदेखील आहेत. कोणत्याही प्रकारचं गर्भनिरोधक साधन वापरताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. नुकताच (26 सप्टेंबर) जागतिक गर्भनिरोधक दिवस साजरा केला गेला. या निमित्ताने निरनिराळ्या गर्भनिरोधक साधनांविषयी माहिती, त्याचे फायदे, तोटे या विषयी जाणून घेऊया. गर्भधारणा टाळण्यासाठी बहुतांश लोक गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्यांमुळे गर्भधारणा टळते. त्यासोबत लैंगिक संक्रमित संसर्गाचा धोकाही कमी होतो. कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधक साधनं वापरण्यापूर्वी लोकांच्या मनात काही कॉमन प्रश्न असतात. यात प्रामुख्याने माझ्या जीवनशैलीनुसार मी कोणतं गर्भनिरोधक वापरू, कोणत्या गर्भनिरोधकामुळे एसटीआयचा धोका कमी होतो, गर्भनिरोधक वापरणं सोपं आहे का, ते खरंच उपयुक्त ठरतं का, कोणतं गर्भनिरोधक पॉकेट फ्रेंडली आहे, गर्भनिरोधकाचे काही दुष्परिणाम आहेत का, अशा प्रश्नांचा समावेश असतो. मात्र काँडोमशिवाय काही गर्भनिरोधक साधनांचा वापर तुम्ही करू शकता. ही साधनंदेखील सुरक्षित मानली जातात. व्हजायनल रिंग हे गर्भनिरोधक साधन आहे. ही रिंग 21 दिवसांपर्यंत वापरता येते. दर महिन्याला मासिक पाळी सुरू होताच सात दिवसांसाठी ही रिंग काढून ठेवता येते. ही स्पेशल रिंग महिलांच्या मासिक पाळीच्या 13 सायकल्सपर्यंत म्हणजेच संपूर्ण एका वर्षासाठी अवांछित गर्भधारणेपासून संरक्षण प्रदान करते. महिला स्वतः ही रिंग योनीमार्गत बसवू अथवा काढून टाकू शकता. रिंग काढून टाकल्यावर तुमची प्रजनन क्षमता लवकर परत येते. मात्र, ज्या महिला इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधक घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य नाही. ही रिंग योग्यवेळी बदलण्याची काळजी घ्यावी लागते. यामुळे `एसटीआय`पासून संरक्षण होत नाही. बर्थ कंट्रोल इंजेक्शन हेदेखील गर्भधारणा टाळण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. यात फक्त प्रोजेस्टिनची इंजेक्शन्स दिली जातात. हे इंजेक्शन एंडोमेट्रियोसिस आणि पेल्व्हिक इन्फ्लेमेशनसारख्या आजारावर उपचारासाठी वापरलं जातं. ते गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेच काम करतं. याचा परिणाम आठ ते बारा आठवड्यांपर्यंत राहतो. या इंजेक्शनमुळे अनियमित रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे त्याचा वापर केलेल्या महिन्यांच्या संख्येचा ट्रॅक ठेवणं आवश्यक आहे. या इंजेक्शनमुळे `एसटीआय`चा धोका कमी होत नाही. वाचा - आळशीपणा घेऊ शकतो तुमचा जीव; गाफील राहू नका, पाहा काय आहे WHO चा रिपोर्ट इंट्रायुटेरियन डिव्हाईस हे आययूडीचं पूर्ण नाव आहे. हे गर्भधारण रोखण्यासाठी वापरलं जाणारं एक साधन आहे. याचा आकार लहान आणि `T` सारखा असतो. हे साधन महिलांच्या गर्भाशयात बसवलं जातं. हे उपकरण महिलांच्या योनीमार्गातून गर्भशयात बसवण्यासाठी डॉक्टर किंवा अनुभवी नर्सची गरज असते. हे लहान उपकरण महिलेच्या गर्भात कॉपर म्हणजे तांबं सोडतं. म्हणून याला कॉपर-टी असंही म्हणतात. त्यामुळे शुक्राणूंना कोणत्याही बीजांडाचं फलन करणं कठीण होतं. यामुळे 5 ते 10 वर्षांपर्यंत 99 टक्क्यांपर्यंत गर्भधारणा टाळता येते. मात्र या उपकरणामुळे पीरियड्सच्या पॅटर्नमध्ये काहीसा बदल होऊ शकतो. हे उपकरण बसवल्यानंतर काही महिन्यांपर्यंत वेदना किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. काही महिलांना पोटाच्या खालच्या भागात क्रॅम्पिंग आणि पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. योनीमार्गात संसर्गाचा धोकादेखील वाढू शकतो. यामुळे एसटीआयचा धोका कमी होत नाही. इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर असुरक्षित लैंगिक संबंधानंतर, सेक्स दरम्यान काँडोम खराब झाल्यास किंवा एखाद्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्यास करता येतो. ही गोळी सेक्सनंतरच्या तीन दिवसांत घेतल्यास गर्भधारणा रोखण्याची शक्यता 85 टक्के असते. त्यामुळे या गोळ्यांना ‘मॉर्निंग आफ्टर पिल्स’ असंही म्हणतात. या गोळ्या जितक्या लवकर घेतल्या जातात, तितका त्यांचा अधिक फायदा दिसतो. या गोळ्यांमुळे मळमळ, उलट्या यांसारखे साईडइफेक्ट दिसतात. या गोळ्यांमुळे महिलांच्या मासिक पाळीवरही परिणाम होऊ शकतो. या गोळ्यांमुळे `एसटीआय`पासून बचाव होत नाही. कंडोम हे एकमेव गर्भनिरोधक साधन आहे, जे गर्भधारणा टाळण्यास मदत करतं तसंच सर्व प्रकारच्या एसटीआयपासून व्यक्तीचे संरक्षण करतं. ही गर्भनिरोधक पद्धत हॉर्मोनमुक्त आणि सहज उपलब्ध होणारी आहे. पुरुष आणि महिला अशा दोघांसाठी कंडोम उपलब्ध आहेत. काँडोममुळे `एसटीआय`पासून संरक्षण होते. काँडोम हॉर्मोनमुक्त असतात आणि सहज उपलब्ध होतात. परंतु, याचा वापर योग्य पद्धतीनं केला नाही तर सेक्सदरम्यान कंडोम फाटण्याची शक्यता असते. यामुळे प्रेग्नसीची शक्यता वाढते. काही लोकांना लेटेक्स काँडोमची अॅलर्जी असते.
गर्भनिरोधक इम्प्लांट छोट्या आणि बारीक प्लॅस्टिकपासून बनवलेला एक रॉड असो. हा महिलांच्या योनीच्या आतल्या भागातल्या त्वचेवर बसवली जातो. यात प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन असतं आणि हा हॉर्मोन हळूहळू रक्तात मिसळतो. यामुळे चार वर्षापर्यंत गर्भधारणा टाळता येते. हे इम्प्लांट आगपेटीतील काडीच्या आकाराप्रमाणे असतात. यामुळे लैंगिक संक्रमित संसर्गापासून संरक्षण मिळत नाही. गर्भनिरोधक गोळ्या दिवसातून एकदाच घेता येतात. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन महिला या गोळ्यांचा सर्वाधिक वापर करतात. या गोळीचं सेवन योग्य पद्धतीनं केलं तर त्या प्रभावी ठरतात. या सेक्समध्ये व्यत्यय न आणता मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. तसंच या गोळ्यांमुळे मुरुमांची समस्यादेखील दूर होते. जर तुम्ही ही गोळी घेण्यास विसरलात तर त्याचा योग्य परिणाम दिसत नाही. याचा वापर केवळ महिलाच करू शकतात. ज्या महिला इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधक घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही गोळी योग्य नाही. तसंच या गोळ्यांमुळे एसटीआयपासून संरक्षण मिळत नाही.