मुंबई, 15 नोव्हेंबर : बऱ्याचदा आपल्या पोटातून आवाज येतो. हा आवाज गुडगुड असा असू शकतो. ही समस्या माहीत नसलेले काही लोक खूप कमी असतील. सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांमध्ये असताना पोटातून असा आवाज आल्यास काहीवेळा लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते तर बऱ्याचदा लोक याला हसण्यात घेतात. मात्र असे वारंवार होत असेल, तर यामागे नेमके कारण काय याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे?
सध्याच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. पोटाचे आजार होण्याचं प्रमाण तर बऱ्यापैकी जास्त आहे. जेवल्यानंतर अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे काहीवेळा पोटातून आवाज येतात. हा आवाज सतत येत असेल तर हे गंभीर आजाराचे संकेत असतात. वैद्यकीय भाषेत या समस्येला स्टमक गर्गलिंग असे म्हणतात.
Winter Tips : हिवाळ्यात तुम्ही सर्रास करत आहात ही चूक; किडनी कामातून गेलीच समजा
पोटातून आवाज येण्याची कारणं
Foxnews ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला भूक लागल्यावर किंवा तुम्ही नुकतेच जास्त प्रमाणात जेवण केले असल्यास, तुमच्या पोटातून आवाज येऊ शकतो. अन्न पचनमार्गातून आतड्यात जात असते तेव्हा तुमच्या अन्नाचे विघटन होत असते. अशावेळी पोटातून आवाज येऊ शकतो. काहीवेळा शरीरात किंवा पंचमार्गात अडकलेल्या वायूमुळेही आवाज येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही काही जड पदार्थ खाता तेव्हा शरीराला ते पचवणे जड जाऊ शकते. अशावेळीही पोटातून आवाज येणे शक्य आहे.
पोटातून येणाऱ्या आवाजांमागे असू शकतात गंभीर आजार
काहीवेळा पोटातून येणारा गुडगुड आवाज हे एखाद्या समस्येचे लक्षणेही असू शकते. जेव्हा पोटातील आवाजांसोबत तुम्हाला हेव्ही गॅसेस, ढेकर येणे, पोट फुगणे, पोटदुखी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता होत असेल, तर यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामागे गॅस्ट्रोएन्टेरिटिस असे इन्फेकशन किंवा जास्त मद्यपान ही कारणं असू शकतात.
जास्त मद्यपान केल्याने या पोटातून आवाजात येणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात. हे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) देखील असू शकते. तसेच तुम्हाला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी देखील असू शकते. त्यामुळे पोटातून आवाज येत असेल आणि असे वारंवार होत असे तर त्याकडे दुरक्ष करू नका. पोटातून येणाऱ्या आवाजावर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.
पोटातून येणाऱ्या आवाजावर करा हे उपाय
- बऱ्याचदा आपण पाणी कमी पितो. यामुळेही ही बसमस्या उद्भवते. त्यामुळे नियमित योग्य परमनंट पाणी प्या. यामुळे तुमची पचनक्रियाही सुरळीत राहाते आणि पोटातून आवाज येणेही कमी होईल.
करीना कपूरलाही आहे ही वाईट सवय; या गोष्टी आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक
- बऱ्याचदा आपले पॉट रिकामे असल्यावरही पोटातून आवाज येतात. त्यामुळे जर तुम्ही बराच काळ काही खाल्ले नसेल तर काहीतरी पौष्टिक पदार्थ खा. यानेही आवाज बॅन होईल.
- पुदिना, आलं आणि बडीशेप यांपासून बनवलेला हर्बल चहा तुमच्या पचनास मदत करू शकतो. यामुळे तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना आराम मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Stomach