Home /News /lifestyle /

पालक खाऊन शक्ती मिळवणारा Popeye नव्हता खोटा; खरंच ही भाजी पेशींना पुरवते इंधन, वाचा नवं संशोधन

पालक खाऊन शक्ती मिळवणारा Popeye नव्हता खोटा; खरंच ही भाजी पेशींना पुरवते इंधन, वाचा नवं संशोधन

Popeye the sailor नावाचं कार्टून काही वर्षांपूर्वी खूप लोकप्रिय होतं. हा पॉपॉय शक्ती हवी असते त्यावेळी पालकाचा कॅन संपवतो. पण खरोखर पेशींना थेट शक्ती पुरवते ही भाजी. वाचा नवं संशोधन काय सांगतं..

    वॉशिंग्टन, 6 ऑक्टोबर : लहानपणी आपल्याला घरातले मोठी माणसं सांगत असतात, ‘ पालेभाज्या खा म्हणजे शक्ती येईल.’  थोडं मोठं झाल्यावर आपल्याला टीव्हीवरच्या कार्टुनमध्ये पॉपॉय ( Popeye the sailor) हा खलाशी भेटतो आणि आपली मित्र होतो. त्याला जेव्हा शक्तीची गरज पडते तेव्हा तो स्पिनॅच म्हणजेच पालकाच्या कॅनमधला पालकाचा रस पिताना आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपल्या मनावर पालेभाजीचं महत्त्व बिंबवण्यासाठी वापरलेल्या या युक्तीला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. पालकापासून कार्बन नॅनोशीट्स तयार करता येतील आणि ती शरीरातील पेशींना उर्जा देणाऱ्या ऑक्सिजन-रिडक्शन रिअक्शनमध्ये कॅटेलिस्ट म्हणजे संप्रेरक म्हणून वापरता येतील असं नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील चार शास्त्रज्ञांनी हे संशोधन करून ACS ओमेगामध्ये ते प्रकाशित केलं आहे. earth.com या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत या संशोधनातील प्रमुख अभ्यासक शोंगझांग झोऊ म्हणाले, ‘ऑक्सिजन रिडक्शन रिअक्शनसाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून शाश्वत स्वरूपाचं संप्रेरक तयार करता येऊ शकतं असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.’ कॅटॅलिस्ट काय असतो? कोणत्याही केमिकल रिअक्शनमध्ये कोणताही बदल न करता किंवा शोषला न जाता केवळ रिअक्शनचा वेग वाढवणाऱ्या घटकाला कॅटॅलिस्ट किंवा संप्रेरक म्हणतात. ऑक्सिजन रिडक्शन रिअक्शनमध्ये (ORR) ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करून शरीरातील केमिकल उर्जा इलेक्ट्रिकल उर्जेत रूपांतरित केली जाते.  संशोधकांनी पालकातून कार्बनवर आधारित कॅटॅलिस्ट शोधून काढला आहे. या संप्रेरकाच्या कार्बन नॅनोशीट्स तयार केल्या जाणार आहेत ज्यांचा आकार माणसाच्या केसापेक्षा हजारोपटींनी बारीक असेल. ही नॅनोशीट्स ऑक्सिजन रिडक्शन रिअक्शनमध्ये वापरता येणार आहेत ज्यामुळे पेशींना उर्जा देण्याला मदत होईल. म्हणजे थोडक्यात काय तर पॉपॉय आणि आपल्या घरातील वडिलधारी मंडळी सांगत होती ते सत्य आधुनिक विज्ञानानी सिद्ध करून दाखवलंआहे. या नव्या संशोधनामुळे नक्कीच आपल्याला म्हणता येईल की या गोष्टीला विज्ञानाचा आधार आहे. पालेभाज्या शरीरासाठी पोषक आणि खूप चांगल्या असतात हे सत्य वारंवार सांगितलं जातं पण त्याला आता वैज्ञानिक आधार मिळाल्यामुळे या सल्ल्याला आता मोठं बळ मिळणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Cartoon, Health

    पुढील बातम्या