जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेग्नन्सीत दुर्लक्षपणा बाळाला स्पायना बायफिडा होण्यास ठरू शकतो कारणीभूत

प्रेग्नन्सीत दुर्लक्षपणा बाळाला स्पायना बायफिडा होण्यास ठरू शकतो कारणीभूत

प्रेग्नन्सीत दुर्लक्षपणा बाळाला स्पायना बायफिडा होण्यास ठरू शकतो कारणीभूत

स्पायना बायफिडा या जन्मदोषामुळे मुलाला चालता-फिरता येत नाही.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते त्यांचे बाळ स्वस्थ असावे, त्यासाठी ते आवश्यक ती सर्व काळजी घेतात. तरीही गर्भावस्थेच्या काळात झालेले दुर्लक्ष बाळाच्या स्पायना बायफिडा या दोषाचे कारण बनते. जन्मजात होणारा स्पायना बायफिडा या आजारामुळे बाळाला चालता-फिरता येत नाही. myupchar.com चे डॉ. प्रदीप जैन यांनी सांगितलं, स्पायना बायफिडामध्ये पाठीचा मणका आणि मेरुदंड व्यवस्थित विकसित होत नाही. या दोषाला न्यूरल ट्यूब दोष या श्रेणीत सामील केलं गेलं आहे. ही ट्यूब म्हणजे भ्रूणची एक संरचना आहे जी बाळाचं मस्तक आणि मेरुदंड विकसित करते. संशोधक असे मानतात की बाळाच्या परिवारातील स्वास्थ्य समस्या, वातावरण आणि आईच्या शरीरातील फॉलिक अॅसिडची कमतरता या गोष्टी कारणीभूत असतात. सोबतच जर गर्भावस्थेच्या काळात फिट्स येण्याची औषधं घेतली तरी बाळाला न्यूरल ट्यूब डिफेक्ट होण्याची शक्यता वाढते. हेच नाही तर ज्या महिलांमध्ये रक्त शर्करा अनियंत्रित असते त्यांच्या बाळाला सुद्धा स्पायना बायफिडा होण्याचा धोका असतो. गर्भवती होण्याअगोदर जर आई लठ्ठ असेल तर तेदेखील बाळाला न्यूरल ट्यूब दोष होण्याचे कारण ठरू शकते. हे वाचा -  गर्भावस्थेत मूत्रमार्गातील संसर्ग टाळण्यासाठी काय करावं? स्पायना बायफिडा तीन प्रकारचे असतात. 1. स्पायना बायफिडा अकल्टा, 2. मेनिनगोसील आणि 3. माइलोमेनिनगोसील. आजाराची गंभीरता, आकार, प्रकार, स्थान आणि त्यातील गुंतागुंत याच्या आधारावर हे तीन प्रकार पडले आहेत. जन्म झाल्यावर किंवा त्यानंतर स्पायना बायफिडाची लक्षणं बाळात दिसू लागतात त्यात पायाला लकवा होणे, मल-मूत्र विसर्जनावर नियंत्रण नसणे, त्वचा असंवेदनशील असणं, फिट्स येणं, पाय आणि कंबरेच्या आकारात विकृती आणि पाठीचा कणा वाकणं इत्यादी सामील आहेत. स्पायना बायफिडामध्ये मज्जारज्जूमध्ये संक्रमण होण्याचा धोका असतो. याचा उपचार आजाराच्या गंभीरतेवर अवलंबून असतो. जर तो स्पायना बायफिडा अकल्टा आहे तर त्यात उपचाराची गरज नसते. तो खूप कमी प्रभाव टाकतो. यात भ्रूण तयार होताना मेरुदंड आणि त्याच्या आसपासची संरचना बाळाच्या शरीराच्या आतच राहते पण कण्याचा खालचा भाग व्यवस्थित विकसित होत नाही. हे वाचा -  लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांच्या आरोग्याबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता अन्य प्रकारच्या स्पायना बायफिडामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता पडते. या शस्त्रक्रिया जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर केल्या जातात. गर्भावस्थेच्या 24व्या आठवड्यात शत्रक्रिया करून स्पायना बायफिडा ठिक करता येतो. या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर आईच्या गर्भाशयाला उघडून बाळाच्या मेरुदंडाला ठिक करतात. याने जन्मसंबंधी दोष होण्याचा धोका कमी होतो. पण या प्रक्रियेमध्ये जास्त धोका असतो. बाळ लवकर जन्माला येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जन्मानंतरच्या मेनिनगोसील शस्त्रक्रियेत मेनिन्जेसला योग्य ठिकाणी केले जाते आणि मोकळ्यापेशी बंद केल्या जातात. या स्थितीत मेरुदंड नैसर्गिकरित्या वाढतो त्याने मज्जारज्जूला धक्का न लागू देता अडचण सहज दूर करता येते. अन्य प्रकारच्या माइलोमेनिनगोसीलमध्येदेखील शस्त्रक्रियेची गरज असते. त्यात डॉक्टर मेरुदंड आणि अन्य ऊतींना शरीराच्या आत करतात आणि स्नायू आणि त्वचेने झाकून टाकतात. स्पायना बायफिडापासून बचाव मुश्किल आहे पण गर्भावस्थेच्या काळात फॉलिक अॅसिड घेतलं, वेळेवर चाचण्या केल्या तर या समस्येपासून वाचता येते. फॉलिक अॅसिड आणि अन्य जीवनसत्व घेण्यानं जन्मदोष निर्माण होण्याचा धोका कमी होतो. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - आजार न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pregnancy
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात