सामान्यपणे मुलं जमिनीवर खेळतात, अस्वच्छही होतात, अनेक लोकांच्या संपर्कात येतात, कित्येक विषाणूंच्याही संपर्कात येतात. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. स्वच्छता आणि कीटाणूविरहित वातावरणामुळे त्यांच्या शरीराची कार्य करण्याची क्षमता कमजोर होत आहे. अशा परिस्थितीतील व्यक्तीला अॅलर्जीसारखी समस्या उद्भवत आहे.