जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्ही खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; खिशाला परवडणाऱ्या दरात या हॉटेलमध्ये मिळतं Unlimited food

तुम्ही खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; खिशाला परवडणाऱ्या दरात या हॉटेलमध्ये मिळतं Unlimited food

तुम्ही खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; खिशाला परवडणाऱ्या दरात या हॉटेलमध्ये मिळतं Unlimited food

या हॉटेलमध्ये एकदा पैसे दिल्यानंतर इतके पदार्थ अनलिमिटेड खायला मिळतील की काय खाऊ असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

पॅरिस, 25 ऑक्टोबर : कोण किती जास्त खातो (Food) किंवा कोण लवकर खातं, अशी खाण्याची स्पर्धा बरेच लोक लावतात (Foodie people). पण या हॉटेलात जर तुम्ही अशी स्पर्धा लावली तर कदाचित कुणीच जिंकणार नाही. कारण इथं तुम्हाला अगदी कमीत कमी दरात इतके पदार्थ खायला मिळतील की तुम्ही खाऊन खाऊन थकाल, तुमचं पोटही भरेल पण पदार्थ संपणार नाहीत. फ्रान्सच्या (France) नारबोनमध्ये (Narbonne) लेस ग्रँड्स (Les Grands) नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलचं बुफे खूप प्रसिद्ध आहे (Les Grands Buffets). इथं खवय्यांसाठी खाण्याच्या पदार्थांचे इतके पर्याय असतात की कोणतं खाऊ असाच त्यांना प्रश्न पडतो. इथं तुम्ही एकदा खाल्लं की तुम्हाला परत लवकर भूक लागणारच नाही. या हॉटेलमध्ये 111 प्रकारचे फ्रेंच डिश (French Dishes) , 70 प्रकारच्या वाइन मिळतात. ग्राहकांसमोर एकाच वेळी हे सर्व पदार्थ सजवून ठेवले जातात. ज्यामुळे ग्राहकांनी त्यापैकी काय खावं हेच समजत नाही. हे वाचा -  अद्भुत! फुलपाखरांनी पुसले कासवांचे अश्रू, अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO एकदा पैसे दिल्यानंतर तुम्हाला जे आणि जितकं खायचं आहे, तितकं तुम्ही खाऊ शकता. खाण्यावर बिलकुल मर्यादा नाही. आता इतकं खाणं तर तुम्हाला फुकट मिळणार नाही. साहजिकच तुम्हाला पैसे मोजावे लागतील. पण तुम्हाला आश्चर्य वाटले फक्त 50 डॉलर म्हणजे जवळपास 3,700 रुपयांत तुम्हाला इतकं खायला मिळतं आहे.

ऑडिटी सेंट्रेल वेबसाइटच्या रिुोर्टनुसार हे हॉटेल 1989 साली सुरू झालं. आपल्या फ्रेंच व्यंजनांनी हे हॉटेल सर्वांना आकर्षित करून घेतं. या हॉटेलमध्ये बुफे खूप सुंदररित्या सजवला जातो, जे ग्राहकांना खूपच आवडतं. हे वाचा -  क्या बात! फक्त चिकन खा आणि मिळवा 1 लाख रुपये पगार, Job साठी असं करा अप्लाय 2018 साली या हॉटेलची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली होती. जगातील सर्वात मोठं चीज प्लॅटर तयार करण्याचा विश्वविक्रम या हॉटेलने केला होता. सप्टेंबरमध्ये या हॉटेलमध्ये तब्बल 1,10,000 लोकांनी बुकिंग केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात