Home /News /lifestyle /

असे घडवले देखणे ट्रायसेप्स.... ! मिलिंद सोमणने शेअर केलं खास फिटनेस सिक्रेट; पाहा VIDEO

असे घडवले देखणे ट्रायसेप्स.... ! मिलिंद सोमणने शेअर केलं खास फिटनेस सिक्रेट; पाहा VIDEO

साठीच्या जवळ आलेला मिलिंद सोमण या वयातही प्रचंड फिट आहे. त्याच्या देखण्या ट्रायसेप्सचं सिक्रेट माहितीये का? पाहा VIDEO

मुंबई, 28 जून : अभिनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman fitness) एक फिटनेस (fitness icon) आयकॉन आहे. वाढत्या वयातही एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. फक्त स्वत:च फिट राहत नाही तर चाहत्यांनाही तो फिटनेस मंत्र (Fitness mantra)देत असतो. सोशल मीडियावरून आपले फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर करत इतरांनाही तो फिटनेस टिप्स देतो. आपण धीर धरून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास फिटनेसचं कोणतंही ध्येय साध्य करू शकतो, असं मिलिंदला (Milind soman instagram post)वाटतं. त्यानं याविषयी एक इन्स्टाग्राम पोस्ट करुन चाहत्यांना मेहनतीला पर्याय नसल्याचं सांगितलं आहे. “लोक मला बरेचदा विचारतात की, मी सोशल मीडियावर दाखवत असलेले माझे ट्रायसेप्स (Triceps) कसे घडवले. खरं तर मेहनतीला (Hard Work) कोणताच पर्याय नाही; पण म्हणून तितकं कठोर असण्याचीही गरज नाही!” असं त्याने त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. “व्यायामाची सुरुवात तुम्ही दररोज फक्त एक मिनिट पुश अप्स (push ups) करून करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हँड स्टँड पुश अप्ससह, पुश-अपचे अनेक प्रकार ट्राय करू शकता. पुढे तुम्हाला जितका कठोर व्यायाम करायचा आहे, तितका तुम्ही करू शकता,” असंही मिलिंदने म्हटलं. यासोबतच त्यानं नदीच्या काठावर (river bank) पुश-अप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हेही वाचा - Alia Bhatt Pregnancy : आलियाने बदललेल्या Instagram DP ची चर्चा; हाच तो क्षण ज्या वेळी रणबीरने केलं होतं प्रपोज 56 व्या वर्षी क्विक वर्कआउट करतानाचा मिलिंद सोमणचा व्हिडिओ याआधी प्रसिद्ध झाला होता ज्यात तो 56 व्या वर्षी 50 पुशअप्स करताना दिसला होता. त्याची बायको अंकिता कोंवरने (Ankita Konwar) शूट केलेल्या या व्हिडिओला मिलिंदनी कॅप्शन दिली होती, 'सूर्यास्तावेळी (Sunset) करण्याचा सर्वोत्तम व्यायाम.'
पुश अप्स का करायला हवेत? बॉडिवेट व्यायाम म्हणून पुशअप पूर्ण शरीर मजबूत करतात आणि स्ट्राँग कोअर, रुंद छाती आणि खांदे मजबूत करण्यात मदत करतात. तर, कोणत्याही प्रकारच्या जखमा टाळण्यासाठी पुशअपचा योग्य फॉर्म आवश्यक आहे.
पुश अप कसे करावेत? योग्य पद्धतीने पुशअप करण्यासाठी जमिनीवर पालथं झोपा आणि आपले हातांच्या आणि पायांच्या जोरावर उठा. नंतर, श्वास घेताना तुमचं शरीर जमिनीपासून एक इंच खाली न्या आणि श्वास सोडताना परत आधीच्या स्थितीत या. पुशअप्स करताना तुमची छाती (Chest) आणि पाठ (Back) कडक असावी, याची काळजी घ्या. प्रत्येकजण पुश-अप करू शकतो का? तुम्ही किती चांगले पुशअप करू शकता हे तुमच्या आणि तुमच्या खांद्याच्या आरोग्यावर अवलंबून आहे, असं सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर, प्रोफेशनल बॉडीबिल्डर (Professional Bodybuilder) आणि IBBF अॅथलीट केनी सोरू (Kenny Soru) यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. “प्रत्येकाच्या खांद्याची रचना वेगळी असते. तसंच प्रत्येकाला झालेल्या दुखापती वेगवेगळ्या असतात आणि लाइफस्टाइलही (Lifestyle) वेगळी असते. त्यामुळे डीप पोझिशनमध्ये भार सहन केल्याने कमी-अधिक प्रमाणात अस्वस्थता येते. त्यामुळे जर तुम्हाला खांद्याच्या दुखापती कधीच झाल्या नसतील तर जोपर्यंत त्याचा तुम्हाला त्रास होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुम्हाला जमेल तितक्या वेगाने पुशअप्स करू शकता," असं सोरू यांनी सांगितलं.
First published:

Tags: Fitness, Fitness test, Health, Milind soman

पुढील बातम्या