मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नवीन वर्षाची सुरुवात दारूच्या हँगओव्हरने करायची नसेल तर हे वाचाच...

नवीन वर्षाची सुरुवात दारूच्या हँगओव्हरने करायची नसेल तर हे वाचाच...

अनेकांचं सेलिब्रेशन हे अनेकदा अल्कोहोल ड्रिंकिंगशिवाय पूर्ण होत नाही.

अनेकांचं सेलिब्रेशन हे अनेकदा अल्कोहोल ड्रिंकिंगशिवाय पूर्ण होत नाही.

अनेकांचं सेलिब्रेशन हे अनेकदा अल्कोहोल ड्रिंकिंगशिवाय पूर्ण होत नाही.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 30 डिसेंबर : नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे सेलिब्रेशनसाठी निमित्त असतं. ख्रिसमसपासूनच खरं तर हे सेलिब्रेशन सुरु होतं. सेलिब्रेशन हे अनेकदा अल्कोहोल ड्रिंकिंगशिवाय पूर्ण होत नाही. सरत्या वर्षाला निरोप द्यायला पार्टी तर होते, पण मग नव्या वर्षाची सुरुवात हँगओव्हरनं करावी लागते. बरेचदा रात्रीची झोप झाली तरीही हा हँगओव्हर उतरत नाही. अल्कोहोल ड्रिंकर्सकडे यावरचे काही उतारे असतातच, पण तरीही हँगओव्हर उतरवण्यासाठी काही उपाय जाणून घेणं फायद्याचं ठरेल. ‘हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग’नं त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

  31 डिसेंबरच्या सेलिब्रेशननंतर काहींना डोकेदुखी, उलट्या, मळमळ, डायरिया असा त्रास होतो. ही हँगओव्हरची लक्षणं असतात. हँगओव्हरमुळे रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, जास्त घाम येतो. हँगओव्हरची कारणं जशी वेगवेगळी असतात, तशीच लक्षणंही बदलतात. दारूमुळे मेंदूतल्या क्रियेवर परिणाम होऊन झोप लागत नाही. आपल्या शरीराच्या चक्रावर दारूचा परिणाम होतो, त्यामुळे जेट लॅगप्रमाणे दारूचा हँगओव्हर चढतो. अल्कोहोलमुळे मायग्रेनचा त्रासही वाढतो.

  खरं तर रक्तातली अल्कोहोलची पातळी जसजशी कमी व्हायला लागते, तसतसा हँगओव्हर चढतो. काही तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलची पातळी शून्य झाल्यावर हँगओव्हरची लक्षणं सर्वांत जास्त जाणवतात. हँगओव्हर चढण्यासाठी किती दारू पिता, हे फार महत्त्वाचं नसतं. काही अभ्यासावरून असं लक्षात येतं, की थोडी किंवा अगदीच कमी दारू पिणाऱ्यांना हँगओव्हर जास्त चढतो. मात्र दारू पिण्याचा वारसा असलेल्यांनाही हँगओव्हर खूप जास्त चढतो, असाही एक अभ्यास सांगतो. थोडक्यात दारूचा हँगओव्हर चढण्यासाठी काही विशिष्ट कारणं असतातच असं नाही. मात्र तो उतरवण्यासाठी काही उपाय नक्की करता येतात.

  हँगओव्हरबाबत डॉ. रॉबर्ट स्विफ्ट यांनी 1998मध्ये केलेलं संशोधन आजही तज्ज्ञ मानतात. ऱ्होड आईसलँडमधील व्हेटरन अफेअर्स मेडिकल सेंटरमधील ते संशोधक होते. त्यांच्या मुलाखतीसह आणखी काही माहितीवरून हँगओव्हर उतरवण्यासाठी पुढील उपाय करता येऊ शकतात.

  हेअर ऑफ द डॉग – अल्कोहोलचा हँगओव्हर उतरवण्यासाठी काही वेळेला थोडं अल्कोहोलही उपयोगी पडतं. त्यालाच ‘हेअर ऑफ द डॉग’ असं म्हणतात. डॉ. स्विफ्ट यांच्या म्हणण्यानुसार, रक्तातली अल्कोहोलची पातळी कमी झाल्यावर हँगओव्हर चढतो. ती साखळी तोडायचं काम हेअर ऑफ द डॉगमुळे होतं. अर्थात त्यामुळे हँगओव्हर पूर्ण उतरत नाही. पण त्याची तीव्रता कमी होऊ शकते.

  कर्बोदकांचं सेवन – बरेच जण दारू पिताना खायला विसरतात. यामुळे रक्तातली साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे नशा पटकन चढते. ब्रेड टोस्ट आणि ज्युस चढलेली नशा उतरवण्यासाठी मदत करू शकतात.

  थोडंसं पाणी – अल्कोहोलमुळे लघवी होते. कारण किडनीमधून लघवी कमी होण्यासाठी मदत करणाऱ्या व्हॅसोप्रेसीन या संप्रेरकाची निर्मिती अल्कोहोलमुळे कमी होते. त्यात हँगओव्हरमुळे कधी उलट्या, लघवी, डायरिया होतो. त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. अशा वेळी थोडंसं पाणी प्यायल्यानं हँगओव्हरची लक्षणं कमी होण्यासाठी फायदा होतो.

  30 व्होडका, 90 व्हिस्की, थोडी बिअर; पार्टीत वेगवेगळी दारू प्यायल्याने काय होतं?

  गडद रंगाची दारू टाळा – व्होडका आणि जीन अशा पारदर्शी दारूमुळे नशा चढण्याचं प्रमाण कमी असतं, असं प्रयोग सांगतात. मात्र व्हिस्की, रेड वाईन, टकीला या गडद रंगाच्या दारूमुळे पटकन नशा चढते. त्यामुळे हँगओव्हर नको असेल, तर अशी दारू टाळा.

  पेन रिलिव्हर घ्या, पण Tylenol नको – हँगओव्हरमुळे निर्माण झालेली डोकेदुखी, मळमळ, अस्वस्थता हे सगळं अस्प्रिन किंवा इबुप्रोफेन सारख्या स्टिरॉईड्स नसणाऱ्या औषधांमुळे कमी होऊ शकतं. मात्र acetaminophen (Tylenol) असलेलं औषध घेऊ नका. त्याचा यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो.

  बी व्हिटॅमिन आणि झिंक – जर्नल ऑफ क्लिनिकल मेडिसिनमध्ये नुकताच एक पेपर प्रसिद्ध झाला. त्यात हँगओव्हरच्या 24 तास आधीच्या व नंतरच्या आहाराबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, ज्यांच्या आहारात झिंक आणि बी जीवनसत्त्वाचा समावेश जास्त होता. त्यांना हँगओव्हरचा जास्त त्रास झाला नाही.

  कॉफी आणि चहाचं सेवन – खरं तर कॅफेनमध्ये हँगओव्हर उतरवण्यासाठी काहीही विशेष नसतं. मात्र कॅफेनमुळे मन उत्तेजित होतं. त्यामुळे हँगओव्हरचा परिणाम थोडासा कमी होऊ शकतो.

  नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे पार्टी तर हवीच. पार्टी आणि दारू हे तर सध्या समीकरणच बनलंय. पण बरेचदा पार्टीचा मूड दारूच्या नशेनं बिघडतो. पार्टीनंतर हँगओव्हरमुळे दुसरा दिवसही वाया जातो. काही वेळेला उलट्या, डायरिया किंवा पोटदुखी जास्त झाल्यामुळे डॉक्टरांकडे जावं लागतं. म्हणून हँगओव्हर होईल अशी पार्टी टाळणं उत्तम, नाहीतर किमान काही उपाय लक्षात ठेवले पाहिजेत.

  First published:
  top videos

   Tags: Alcohol, Home remedies, New year 2023