मकर संक्रांतीला असे बनवा 'तिळगुळाचे लाडू'

मकर संक्रांतीला असे बनवा 'तिळगुळाचे लाडू'

तिळाचे लाडू म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या आवडतीचा पदार्थ. हो आता तो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. तशीच एक पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिळाचे लाडू बनवण्यासाठी खालील सामग्री तुम्हाला मदत करेल.

  • Share this:

12 जानेवारी : तिळाचे लाडू म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या आवडतीचा पदार्थ. हो आता तो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. तशीच एक पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिळाचे लाडू बनवण्यासाठी खालील सामग्री तुम्हाला मदत करेल.

सामग्री :

तिळ- 2 कप (250 ग्राम)

गूळ -1 कप (250 ग्राम)

काजू - 2 चमचे

बदाम -2 टेबल चमचा

लहान वेलची - 7 ते 8

तूप - 2 चमचे

पाककृती

- सगळ्यात आधी तिळ स्वच्छ साफ करा.

- मध्यम आचेवर तिळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

- भाजलेले तिळ काढून ते थोडसे थंड होऊ द्या.

- गुळाचे तुकडे करा.

- कढईत चमचाभर तूप गरम करा आणि त्यात गुळ घाला. मंद आचेवर गूळ वितळू द्या.

- गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करा.

- गूळ थंड झाल्यावर त्यात तिळ, काजू, बदाम आणि वेलची पूड हाताने मिक्स करा आणि त्याचं मिश्रण करा.

- आपल्या तळहातावर थोडं तूप लावा, थोडं थोडं करून मिश्रण घ्या आणि गोल गोल लाडू वळा. तयार केलेले लाडू 4-5 तास खुल्या हवेत ठेवा. त्यानंतर लाडू हवाबंद कंटेनरमध्ये भरुन ठेवा.

तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 05:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading