नवी दिल्ली, 27 जानेवारी : गेल्या काही वर्षांत शेकडो अभ्यासात असं आढळून आलंय की, धूम्रपानाचा (smoking) आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळं फुफ्फुसांचं नुकसान होतं आणि कर्करोगदेखील होतो. पण एका नवीन संशोधनात (research) असा दावा करण्यात आलाय की, तुम्ही धूम्रपान करत नाही, पण जर तुमच्या पूर्वजांनी धूम्रपान केलं असेल तर, तुम्हालाही त्याचा फटका सहन करावा लागू शकतो. संशोधनानुसार, जर एखाद्याला धूम्रपानाचं व्यसन असेल तर त्याचे दुष्परिणाम काही पिढ्यांपर्यंत टिकू शकतात. याचा सरळ अर्थ असा की जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर तर होतोच; पण तुमच्या नातवंडांवर, पतवंडांवरही त्याचा परिणाम होतो. ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठातील (University of Bristol) संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
30 वर्षांच्या अभ्यासात पुरावा सापडला
या अभ्यासाला चिल्ड्रेन ऑफ 90 असं संबोधलं जात (Children of the 90s’) आहे. कारण हे संशोधन चिल्ड्रेन ऑफ 90 प्रकल्पांतर्गत करण्यात आलं आहे. हा अभ्यास नुकताच सायंटिफिक रिपोर्ट्स (Scientific Reports) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात गेल्या 30 वर्षांत रक्त, मूत्र, प्लॅसेंटा, दात, केस आणि नखे यांचे 15 लाख नमुने गोळा केले गेले. या अभ्यासाचा उद्देश जनुकीय आणि पर्यावरणाचा लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती गोळा करणं हा होता. अभ्यासातून असं दिसून आलंय की, धूम्रपानाचे दुष्परिणाम केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरतेच मर्यादित नसून पुढील पिढ्यांवर त्याचा परिणाम दिसून येतो. या अभ्यासात फक्त आजोबा आणि पणजोबा यांचा समावेश करण्यात आला होता. कारण स्वतःच्या तारुण्यात धूम्रपान करणाऱ्या आजी-पणजींची संख्या खूपच कमी होती.
हे वाचा -
‘मुलांना एकटं सोडू नका’; 10 वर्षांच्या लेकाच्या आत्महत्येनंतर बापाची आर्त विनंती!
नातवंडांवर जास्त परिणाम
अभ्यासात असं आढळून आलं की ज्या महिलांचे आजोबा किंवा पणजोबा तारुण्याआधी धूम्रपान करू लागले, त्यांच्या शरीरातील चरबी वाढल्याचं दिसून आलं. अभ्यासात असंही आढळून आलं की, ज्या महिलांचे आजोबा किंवा पणजोबा वयाच्या 13 वर्षांपूर्वीपासून धूम्रपान करत होते, त्यांच्या शरीरात चरबी जास्त असते. त्या तुलनेत नंतर धुम्रपान सुरू करणाऱ्या आजोबा-पणजोबांच्या मुलांमध्ये चरबीचं प्रमाण कमी होतं.
हे वाचा -
लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
मात्र, या अभ्यासातून एक आश्चर्यकारक बाब देखील समोर आली आहे. अभ्यासानुसार, आजोबा किंवा पणजोबा यांच्या धूम्रपानाचा परिणाम फक्त नाती किंवा पणतींमध्ये दिसून आला, तर नातू किंवा पणतूंवर याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.