मुंबई, 05 जानेवारी : फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसभर तर फोनचा वापर सुरू असतोच; पण रात्री झोपतानाही अनेक जण सोशल मीडिया सर्फिंग करत असतात, चित्रपट किंवा सीरिज पाहत असतात. शिवाय झोपताना अनेक जण उशीजवळ फोन ठेवून झोपतात. उशीजवळ फोन ठेवून झोपणं आरोग्यासाठी चांगलं नाही. याचे शरीरावर कोणते चांगले व वाईट परिणाम होतात, ते जाणून घेऊ या. या संदर्भातलं वृत्त 'एबीपी लाइव्ह'ने दिलं आहे.
बऱ्याचदा असं दिसून येतं, की जेव्हा काही जण फोन जवळ ठेवून झोपतात आणि मध्येच डोळे उघडतात तेव्हा फोन हे झोप खराब करण्याचं कारण बनतो. अनेकांना रात्री अनेक वेळा जाग येते. अशा परिस्थितीत जेव्हा ते पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना फोन वापरावासा वाटतो. मग सोशल मीडिया स्क्रोल करण्यात बराच वेळ वाया जातो. फोनचा लाइट मेंदू आणि शरीराला सिग्नल देतो, की तुमची झोपण्याची वेळ संपली आहे. यामुळे झोप उडून जाते.
हे ही वाचा : हेअर कलर सोडा! या तेलामुळे पांढरे केस होतील काळे; जाणून घ्या वापराची पद्धत
फोनचा आरोग्यावर परिणाम होतो का
फोन उशीजवळ ठेवून झोपल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करतात; पण खरंच त्यात काही तथ्य आहे का? स्मार्टफोन अँटेनाच्या नेटवर्कद्वारे रेडिओ लहरी प्रसारित करून कम्युनिकेशन सोयीचं करतात. या रेडिओ लहरींना रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी असंदेखील म्हणतात. त्या लहरी म्हणजे प्रत्यक्षात एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आहे. NTPने स्मार्टफोन जवळ ठेवण्याचे काय परिणाम होतात, याबाबत अभ्यास केला आहे.
यूएस नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्रामने (NTP) 2018 आणि अलीकडच्या काही अभ्यासांचे परिणाम प्रकाशित केले आहेत. त्यांना नर उंदरांमध्ये हृदयाच्या असामान्य ट्यूमरचा धोका वाढलेला आढळला, परंतु मादी उंदरांमध्ये नाही. NTP अभ्यासात या लहरींमुळे मेंदूतल्या विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरची जोखीम वाढत असल्याचीही नोंद केली आहे.
फोन जवळ ठेवून झोपावं की नाही?
यापूर्वीच्या अभ्यासात असं काहीही समोर आलं नव्हतं. अभ्यासाबद्दल काही वादही झाले आणि दुर्दैवाने संशोधक अंतिम निकालापर्यंत पोहोचू शकले नाहीत. यामुळे फोन उशीजवळ ठेवल्याने झोपेवर त्याचे काय परिणाम होतात, याचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. त्याचा फायदा नक्कीच नाही, हेही खरं आहे.
हे ही वाचा : Toxic Positivity : अती सकारात्मकताही ठरू शकते घातक! पाहा काय असते 'टॉक्सिक पॉझिटिव्हिटी'
दरम्यान, एका अहवालात असंही समोर आलं आहे, की मोबाइल फोनमधून हानिकारक रेडिएशन्स बाहेर पडतात. ती तुमच्या मेंदूला हानी पोहोचवू शकतात. यामुळे डोकेदुखी, स्नायू दुखणं आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तुम्ही दिवसभर तुमचा फोन वापरता. त्यामुळे तो रात्री लांब ठेवण्यास काहीच हरकत नसावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile Phone, Phone, Smart phone