मुंबई, 23 मार्च : आपल्या सगळ्यांची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळेच तिची काळजी घेण्याची पद्धतीही वेगवेगळी असली पाहिजे. विशेषतः उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणं थोडं अवघड असतं. आपल्या त्वचेत सीबम नावाचा एक घटक असतो, जो त्वचेतील ओलावा टिकवून ठेवत, तिचं पोषण करतो. मात्र, त्यामुळं आपली त्वचा तेलकटही होऊ शकते. तेलामुळं तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सही येऊ शकतात. मात्र हे तुम्ही रोखू शकता. त्वचा हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही त्वचेची चांगली निगा राखली नाही तर त्वचेचं नुकसान होईल. उन्हाळ्यात आपण केलेल्या लहान-सहान चुकीच्या गोष्टी ऑईली स्किनची समस्या अजूनच वाढवतात. जाणून घ्या या चुका आणि त्या करणं टाळा. कमी पाणी पिणं तुम्ही योग्य प्रमाणात पाणी न पिल्यास तुमचं शरीर स्वतःच स्वतःला सिबेशियस ग्रंथींनी हायड्रेट करू लागेल. यामुळं शरीरातून जास्त सिबम निघेल. गरजेहून जास्त सिबममुळं त्वचा तेलकट होते. हेही वाचा - पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त गरम का होते? तज्ज्ञांनी सांगितले याचे कारण चुकीचं तेल वापरणं बाजारात त्वचेची निगा राखण्यासाठी विविध तेल मिळतात. मात्र, तुमची त्वचा तेलकट असेल तर हे तेल घेताना जरा लक्षपूर्वक निवड करा. कारण तेलांमुळं चेहरा अजूनच तेलकट बनतो. चेहऱ्यावर खोबरेल तेल तर अजिबात लावू नका. मॉश्चरायझर न लावणं तुम्हाला वाटत असेल की तेलकट त्वचा असलेल्यांनी मॉश्चरायझर लावण्याची गरज नाही. मात्र त्वचा कुठल्याही प्रकारची असो, मॉश्चरायझर गरजेचं आहेच. मात्र, योग्य तेच मॉश्चरायझर निवडा. योग्य मेकअप प्रॉडक्ट्स न निवडणं मेकअप अनेकजण नियमित करतात. मात्र, स्किन केअर प्रॉडक्ट्सप्रमाणेच मेकअप प्रॉडक्ट्स निवडतानाही काळजी घ्या. विशेषतः ऑईली स्किन असलेल्यांनी तर हे जास्तच काळजीपूर्वक केलं पाहिजे. हेही वाचा - मानसिक थकवा-लो प्रोडक्टिव्हिटी असू शकते Overthinking चे कारण, असे करा नियंत्रित चुकीचा आहार आणि हार्मोन्समध्ये बदल तुम्ही जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खात असाल तर स्किन ऑईली होते. यासाठी जेवण करताना संतुलितच आहार घ्या. यामुळे हार्मोन्समध्ये बदल होणार नाही. शिवाय त्वचाही तेलकट होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.