मुंबई, 28 डिसेंबर : टी ट्री ऑइलमध्ये देखील इतर इसेन्शियल ऑइलसारखे विशेष गुणधर्म आहेत. यामध्ये अँटीसेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल घटक आढळतात. ज्याचा त्वचेला आणि केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. टी ट्री ऑइल चेहऱ्यावर आणि केसांवर अनेक प्रकारे वापरले जाते, पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या मदतीने मानेवर, चेहऱ्यावर आणि पाठीवरचे चामखीळ कसे काढायचे ते सांगत आहोत. चामखीळ ज्यांना स्किन टॅग किंवा म्हसदेखील म्हणतात. जर हे त्वचेचे टॅग वेदनारहित असतील, परंतु ते हळूहळू संपूर्ण मानेवर, पाठीवर किंवा हातात पसरतात. जे त्वचेवर चांगले दिसत नाही. मात्र यामुळे चिंतीत होण्याऐवजी टी ट्री ऑइल वापरून ते कसे दूर केले जाऊ शकतात. हे जाणून घेऊया. चामखीळ घालावण्यासाठी असे वापरा टी ट्री ऑइल - चामखीळ काढून टाकण्यासाठी ऑइल कॉम्प्रेस हा पहिला मार्ग आहे, हेल्थलाइननुसार, टी ट्री ऑइलमध्ये कापसाचा तुकडा भिजवा आणि चामखीळवर लावा. आता त्यावर काही टेप किंवा पट्टी लावा जेणेकरून कापूस त्याच्या जागेवरून हलणार नाही. हे रात्रभर असेच राहू द्या. चामखीळ पडेपर्यंत ही प्रक्रिया रोज रात्री करत रहा. लक्षात ठेवा की, कोणत्याही प्रकारचे इरिटेशन झाल्यास टी ट्री ऑइल वापरू नका. - टी ट्री ऑइल आणि व्हिनेगर हे चामखीळ काढून टाकण्याचा आणखी एक मार्ग आहे. सर्व प्रथम कापसावर अप्पल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्यावर टी ट्री ऑइलचे काही थेंब टाका. आता तो कापूस चामखीळावर 15 मिनिटे ठेवा आणि कोरडा झाल्यावर कापूस काढून टाका. साबण आणि पाण्याच्या मदतीने काही तासांनंतर ते स्वच्छ करा. हा उपाय दिवसातून 2 किंवा 3 वेळा केल्या जाऊ शकतात. मात्र हे मिश्रण डोळ्यांना किंवा डोळ्याभोवती लावू नये हे लक्षात ठेवा. - टी ट्री ऑइल थेट त्वचेवर लावण्याचा सल्ला दिला जात नाही. म्हणूनच टी ट्री ऑइल नेहमी खोबरेल तेल किंवा जोजोबा ऑइलसारख्या इतर तेलात मिसळून वापरले जाऊ शकते. त्वचेवरील चामखीळ काढून टाकण्यासाठी, 1 चमचे कॅरियर ऑइलमध्ये टी ट्री ऑइलचे 3-4 थेंब घ्या आणि नंतर ते चांगले मिसळा. दोन्ही तेल चांगले मिसळले की, चामखीळवर लावा. तुम्ही हा उपाय दिवसातून दोनदा करू शकता आणि चामखीळ कोरडे होईपर्यंत आणि त्वचेपासून वेगळे होईपर्यंत अनुसरण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







