मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin Care : त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा

Skin Care : त्वचेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मुलतानी माती हा उत्तम उपाय; लगेच ट्राय करून बघा

स्किन केअर

स्किन केअर

धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेला हानी पोहोचते. चेहरा खराब होतो. त्वचेची निगा राखण्यासाठी कोणता आयुर्वेदिक उपाय आहे हे जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 ऑक्टोबर :   आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी विविध कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. अनेकदा दिसण्यावरूनच व्यक्तीची पारख केली जाते. पुरुषांपेक्षा महिलांचा आकर्षक दिसण्यावर भर अधिक असतो. त्यासाठी वेगवेगळी सौंदर्यप्रसाधनं उपलब्ध असतात. त्वचेची निगा राखण्यासाठी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरणं सगळ्यांनाच परवडत नाही. काहींना त्याच्या वापरामुळे अ‍ॅलर्जी होते. एखादं घरगुती, स्वस्त आणि उपयुक्त असणारं प्रॉडक्ट असेल, तर ते नक्कीच हितावह ठरतं. त्वचेची निगा राखण्यासाठी कोणता आयुर्वेदिक उपाय आहे हे जाणून घेऊ या.

धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेला हानी पोहोचते. चेहरा खराब होतो. यासाठीच त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. त्वचेची उत्तम निगा राखण्यासाठी मुलतानी मातीचा वापर हितावह ठरतो. मुलतानी मातीचा वापर प्राचीन काळापासून केला जातोय. मुलतानी माती सहज उपलब्ध होते. तसंच तिचा वापर करणंही अगदी सोपं आहे. मुलतानी माती त्वचेसाठी कशी उपयुक्त आहे हे जाणून घेऊ या.

पिंपल्स अर्थात तारुण्यपिटिका घालवण्यासाठी उपयुक्त

अनेक तरुण-तरुणींच्या चेहर्‍यावर पिंपल्स दिसतात. मुलतानी मातीच्या नियमित वापराने पिंपलची समस्या कमी होते. तसंच पिंपल्सची समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठीही मुलतानी मातीचा वापर उपकारक ठरतो. नैसर्गिक सौंदर्य खुलावं यासाठी मुलतानी मातीत गुलाबपाणी मिसळावं. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

हेही वाचा - या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं तरुणांच्या चेहऱ्यावर येतात पिंपल्स, ही आहेत इतर कारणे

त्वचेची तकाकी टिकवण्यासाठी

मुलतानी मातीमुळे चेहर्‍यावरच्या मृत पेशी अर्थात डेड सेल्स नाहीशा होतात. तसंच त्वचेवरची रंध्रं किंवा छिद्रं मुलतानी मातीच्या साह्याने बंद करणं शक्य होतं. मुलतानी मातीचा लेप लावल्यास त्वचेवरचे काळे-पांढरे डाग घालवता येतात.

त्चचेचं टॅनिंग कमी होतं

उन्हामुळे अनेकांची त्वचा टॅन होते, अर्थात, त्वचा काळी होते. त्यावर मुलतानी माती खूप गुणकारी आहे. मुलतानी माती टॅनिंगमुळे झालेली त्वचेची हानी भरून काढते. त्वचेचा काळपटपणा बर्‍याच अंशी कमी होतो.

मुलतानी मातीबद्दल थोडंसं

मुलतानी मातीला फुलर्स अर्थ असंही म्हटलं जातं. मुलतानी माती अतिशय गुणकारी आहे. यात मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम आढळतं. मुलतानी माती हे हायड्रेटेड अ‍ॅल्युमिनिअम सिलीकेटचं एक रूप आहे. यात मोंटमोरिल्लोनाइटसोबत एटापुलगाइट आणि पॅलगोरोसाइटसारखी मिनरल्सही आहेत.

मुलतानी मातीचा वापर कसा कराल?

मुलतानी मातीचा उपयोग फेसपॅक म्हणून करता येतो. यासाठी मुलतानी मातीत थोडंसं गुलाबपाणी मिसळावं. यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावावं. हे मिश्रण डोळ्यावर लावू नये. चेहर्‍यावरचा लावलेला लेप सुकल्यावर कोमट पाण्याने तोंड धुवावं. आठवड्यातून दोनदा तुम्ही मुलतानी मातीचा लेप चेहर्‍यावर लावू शकता.

First published:

Tags: Lifestyle