जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या राशींसाठी 2023 ची सुरुवात होणार धमाकेदार! पदोन्नतीसह धनलाभ मिळण्याचा योग

या राशींसाठी 2023 ची सुरुवात होणार धमाकेदार! पदोन्नतीसह धनलाभ मिळण्याचा योग

प्रमोशन आणि पगारवाढीचे योग

प्रमोशन आणि पगारवाढीचे योग

Shukra Gochar 2022 In December: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष आनंददायी ठरणार आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 डिसेंबर : ज्योतिषशास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. भविष्य कथनावेळी या तिन्ही गोष्टींचा विचार केला जातो. प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. रवी एक महिन्यानंतर, तर चंद्र सुमारे अडीच दिवसांनंतर राशिपरिवर्तन करतो. नवग्रहांमध्ये शनी हा मंदगती ग्रह मानला जातो. तो अडीच वर्षांनी राशिपरिवर्तन करतो. त्याचप्रमाणे बुध, शुक्र, मंगळ हे ग्रहदेखील ठरावीक कालावधीनंतर राशिपरिवर्तन करतात. या ग्रहांच्या राशिपरिवर्तनाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर दिसून येतो. लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून, 2023ला प्रारंभ होणार आहे. शुक्राने 5 डिसेंबर रोजी गुरूच्या धनू राशीत प्रवेश केला आहे. धन, संपत्तीचा कारक असलेला शुक्र ग्रह धनू राशीतून भ्रमण करत असल्याने तो काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. शुक्र सध्या धनू राशीतून गोचर भ्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार धनू राशीत बुध आणि शुक्राची युती होणार असून यामुळे लक्ष्मीनारायण योग होत आहे. हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभफलदायी आहे. या योगाचा सर्व राशींवर परिणाम दिसून येणार असून, अनेक राशींच्या जातकांना या योगामुळे चांगली यशप्राप्ती होईल. वाचा - Numerology : जन्मतारखेनुसार 14 डिसेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राचं धनू राशीतलं भ्रमण आणि लक्ष्मीनारायण योग सिंह राशीच्या जातकांसाठी शुभफलदायी ठरेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप यश मिळेल. व्यापारात चांगली प्रगती होईल. धनलाभाचे योग आहेत. या कालावधीत उत्पन्नात वाढ होईल. अविवाहित व्यक्तींचे या कालावधीत विवाह होऊ शकतात. विवाहितांना आनंद, समाधान मिळेल. तसंच आर्थिक स्थिती मजबूत होईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कन्या : लक्ष्मीनारायण योगामुळे कन्या राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मीमातेची विशेष कृपा राहील. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी खूप चांगला आहे. व्यापार किंवा नोकरीतून विशेष लाभ होईल. व्यापारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असलात, तर हा कालावधी यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक आयुष्य आनंददायी असेल. आरोग्य सुधारेल. धनू : ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीत सध्या शुक्राचं गोचर सुरू आहे. त्यातच लक्ष्मीनारायण योग होत आहे. कारण बुधदेखील धनू राशीतूनच भ्रमण करत आहे. त्यामुळे धनू राशीच्या जातकांच्या जीवनात यशाचा काळ सुरू होईल. या कालावधीत प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो. संततीप्राप्तीचेदेखील योग आहेत. या कालावधीत जोडीदाराला आनंदी ठेवा. जीवनात यश मिळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात