जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नाच्या चर्चेत श्रद्धा कपूर देणार सरप्राइझ; Propose day दिवशीच शेअर केली पोस्ट

लग्नाच्या चर्चेत श्रद्धा कपूर देणार सरप्राइझ; Propose day दिवशीच शेअर केली पोस्ट

लग्नाच्या चर्चेत श्रद्धा कपूर देणार सरप्राइझ; Propose day दिवशीच शेअर केली पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ (rohan shreshta) यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 फेब्रुवारी :  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. श्रद्धा रोहन श्रेष्ठला डेट करत असल्याची चर्चा आहे. रोहन श्रेष्ठ (rohan shreshta) हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठ यांचा मुलगा. आता त्याचंही फोटोग्राफी क्षेत्रात मोठं नाव आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असं म्हटलं जातं. आता ते दोघं लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. याच चर्चेदरम्यान श्रद्धा कपूरनं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आज प्रपोज डे आहे आणि आजच्याच दिवशी श्रद्धा कपूरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशी पोस्ट केली आहे. ज्यामुळे सर्वांची उत्सुकता आता अधिक वाढली आहे. श्रद्धानं केलेल्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे, उद्या संध्याकाळी 6.30 वाजता मी खूप स्पेशल अनाऊंसमेंट करणार आहे.

जाहिरात

श्रद्धाची ही अनाउंसमेंट नक्की काय असणार आहे, याची प्रतीक्षा आता तिच्या चाहत्यांना लागली आहे. नुकतंच वरुण धवनचं लग्न झालं. त्यावेळी श्रद्धानं त्याला इन्स्टाग्रामवर  शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर वरुणनं तूदेखील लग्न करण्यास तयार असशील असं म्हटलं होतं. त्यामुळे श्रद्धा आणि रोहन लग्न करणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. हे वाचा -  अमिताभ यांची नात नव्याला डेट करतोय मीजान? जावेद जाफरींनी दिलं उत्तर श्रद्धाच्या लग्नाबाबत तिचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी भाष्य केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शक्ती कपूर यांनी श्रद्धाने कुणाशीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्यास माझा पाठिंबा असल्याचं सांगितलं. तिच्या लग्नासंदसर्भात आणि आयुष्यासंदर्भात निर्णय घेण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. तिनं तिचा निर्णय मला सांगितल्यास माझा पाठिंबाच असणार असल्याचं शक्ती कपूर म्हणाले. केवळ रोहनच नाही तर कुणाबरोबरही तिनं लग्न करण्याचा आणि आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतल्यास तिला माझा पाठिंबा आहे. हे वाचा - PHOTOS: ठरलं! प्रभास अडकणार लग्नाच्या बेडीत, कोण आहे नवरी? रोहनविषयी बोलताना शक्ती यांनी रोहन हा आमच्या घरी लहानपणापासून येत असल्याचं त्यांनी म्हटले. श्रद्धा आणि रोहन चांगले मित्र आहेत परंतु त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे की नाही याबद्दल मला माहिती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. श्रद्धाने मला याबद्दल अजून काहीही सांगितलं नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी  श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठशी विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा होती. त्यावर श्रद्धा कपूरने जास्त प्रोजेक्टमुळे ती लग्नाबद्दल विचार करत नाही आहे. ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात