मुंबई, 27 ऑगस्ट: आपल्याला दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींची गरज भासते. कपडे, शूज स्मार्टफोन, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस, घरातील किराणा, सौंदर्यप्रसाधनं अशा अनेक गोष्टी आपल्याला दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असतात. जर आपल्याला या गोष्टी खरेदी करायच्या असतील, तर आपल्याला विविध ठिकाणं फिरावी लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही जवळच्या एखाद्या मॉल भेट दिली, तर तुम्हाला या सर्व गोष्टी एका छताखाली उपलब्ध होतात. ब्रँडेड आणि खात्रीशीर वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण मॉलला जाण्यास पसंती देतात. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कपडे, शूज, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह विविध गोष्टी तुम्हाला मॉलमध्ये खरेदी करता येतात. याशिवाय कामात व्यस्त असणाऱ्यांसाठी इतर अर्थानंही मॉल महत्त्वाचा ठरतो. मॉलमध्ये फॅमिलीसोबत खरेदी करता येते. सोबतच जर कुटुंबात लहान मुलं असतील, तर त्यांना विविध खेळ खेळण्याची सोय अनेक मॉलमध्ये उपलब्ध होतात. मॉलमध्ये फूड मॉल असेल तर कुटुंबासोबत खाण्याचाही आनंद लुटता येतो आणि सिनेमा थिएटर असतील, तर चित्रपटही पाहता येतात. असे एक ना दोन, अनेक फायदे मॉलचे लोकांना होतात. तुम्ही जर नवी मुंबईत राहत असाल, तर नवी मुंबईमध्ये असे अनेक मॉल आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता, मुलांसोबत वेळ घालवू शकता, कुटुंबासोबत विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता आणि सिनेमागृहात चित्रपटांचा आनंदही घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया नवी मुंबईतील काही शॉपिंग मॉलची लिस्ट- 1. नेक्सस सीवूड्स (Nexus Seawoods)- पत्ता: प्लॉट नं. R, 1, सीवूड्स स्टेशन रोड, रेल्वे स्टेशन जवळ, नेरूळ ईस्ट, सेक्टर 40, नेरूळ , नवी मुंबई , महाराष्ट्र- 400706 2. इनऑर्बिट मॉल, वाशी (Inorbit Mall Vashi)- पत्ता: रेल्वे स्टेशन, पाम बीच रोज, सेक्टर 30 ए, वाशी , नवी मुंबई , महाराष्ट्र 400705 फोन: 022 6777 7614 3. रघुलीला मॉल, वाशी (Raghuleela Mall, Vashi)- पत्ता: प्लॉट नं 34, 35, 38, प्रणवानंदजी मार्ग, सेक्टर 30ए, वाशी , नवी मुंबई , महाराष्ट्र- 400703 फोन: 022 2781 0853
**हेही वाचा:**
Best Restaurants in Thane: खवैय्ये आहात? ‘ही’ आहेत ठाण्यातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट, मिळेल चविष्ट जेवण
4. लिटल वर्ल्ड मॉल (Little World Mall)- पत्ता: प्लॉट नं 21, प्रवेश मार्ग, सेक्टर 2, खारघर , नवी मुंबई , महाराष्ट्र 410210 फोन: 022 2774 2800 5. प्राइम मॉल (Prime Mall)- पत्ता: प्लॉट डी, 66, प्राइम मॉल, सेक्टर 12, खारघर, नवी मुंबई , महाराष्ट्र 410210 6. ओरियन मॉल (Orion mall, Panvel)- पत्ता: प्लॉट नं: 311, ओरियन मॉल, एसटी बस डेपोजवळ, फॉरेस्ट कॉलनी, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र 410206
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.