Home /News /lifestyle /

Sexual Wellness: BBW चं आकर्षण वाटतं, मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणं नैसर्गिक आहे की...?

Sexual Wellness: BBW चं आकर्षण वाटतं, मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणं नैसर्गिक आहे की...?

Sexual Wellness : तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून.

प्रश्न 1 : मोठ्या वयाच्या स्त्रीकडे आकर्षित होणं हे नैसर्गिक आहे का? त्या माझ्यापेक्षा १०-१५ वर्षे, कधी कधी २० वर्षांनीही मोठ्या असतात. मला बिग-ब्युटीफुल वूमनचं (BBW)आकर्षण वाटतं. मी 24 वर्षांचा तरुण असून, माझे या सर्व महिलांशी शारीरिक संबंध आहेत. त्या सर्व विवाहित आहेत. उत्तर : BBW चा अर्थ बिग-ब्युटीफुल वूमन असा होतो. त्यातही बिग म्हणजे जाडजूड, वळणदार, घाटदार, विशाल, हस्की, गुबगुबीत अशा अनेक छटा त्यात ध्वनित होतात, पण त्याला सर्वसाधारणपणे जाड असेच संबोधले जाते. काहीवेळा BBW ही टर्म काही लोकांसाठी आर्थिक संदर्भातही वापरली जाते. तर बरेच लोक याचा संदर्भ पॉर्नोग्राफी, जाड महिलांमधील अतिसेक्शुअलायझेशनशी जोडतात. वैयक्तिकरित्या मला यात फार सकारात्मक छटा सूचित होते. शरीराच्या सकारात्मक हालचालींशी त्याचा संबंध आहे. माझ्याकरता, BBW मधून जाड लोकही सेक्स करू शकतात, जाड लोक सेक्श्युअल असतात, ते सेक्सी वाटू शकतात आणि त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात, हे स्पष्ट होतं. टीव्हीवर कधीही कारमध्ये पुढच्या सीटवर जाडजूड व्हॅम्पायर असल्याचं किंवा एखादी जाड मुलगी रस्त्याच्या कडेला पडलेली आहे, असे दाखवले जात नाही. सतत असा उल्लेख करणे, टीव्हीवरील चित्रण हे अचूक नाही. कोणीही व्यक्ती नेमके काय आकर्षक आणि काय नाही, याची व्याख्या करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या  बिग-ब्युटीफुल वूमन (BBW)कडे आकर्षित झालेले असाल तर त्यात काहीही चूक नाही. आता वयात खूप अंतर असलेल्या स्त्रीबरोबर नातं जोडण्याबाबत, विचाराल, तर त्यातही काही वावगं नाही. पुरुषांना मोठ्या वयाच्या स्त्रीबरोबर सेक्सचा आनंद घेण्याची इच्छा असते, यामागे विविध करणे असतात.  मोठ्या वयाच्या स्त्रिया सेक्समध्ये मॅच्युअर असतात. त्यांच्या गरजा व्यक्त करण्याबाबत कमी संकोचत असतात आणि सेक्समध्ये नवीन प्रयोग करून बघण्यास तयार असतात. त्यामुळे पुढाकार घेणाऱ्या पुरुषावर दडपण कमी असते. दोन्ही बाजूंनी समान सक्रियता असते. त्यामुळे पुरुष स्त्रीला अधिक चांगला आनंद देऊ शकतो. समाधान करू शकतो. त्यामुळे त्याचा आपल्या क्षमतांवरील विश्वास वाढतो. तरुण पार्टनर असेल तर पुरुषाला नेहमीच आपण कसा परफॉंर्मंस करू, तिला समाधान देऊ शकू का नाही याची चिंता असते;परंतु मोठ्या वयाच्या पार्टनरबरोबर ते अधिक मोकळेपणा अनुभवू शकतात. मोठ्या वयाचा पार्टनर त्यांच्या क्षमतेवर शंका न घेता, न दुखावता, समजून सांगू शकतील. त्यामुळे दोन्ही पार्टीजना आनंद घेता येतो. पुरुष त्याच्याहून मोठ्या वयाच्या स्त्रीला आपली भीती, काळजी सहजपणे सांगू शकतो. ती तिच्या बाजूने त्यावर उपाय सांगून दोघांनाही आनंद मिळेल, याची काळजी घेऊ शकते. अर्थात सेक्सवर भावनिक, मानसिक घडामोडींचा  प्रभाव पडत असतोच.  प्रत्येकाची गरज आणि अपेक्षा याचे मूल्यमापन करणं, महत्त्वाचं असतं. दोघांनाही आनंद मिळत नसेल तर त्या नात्याला अर्थ नाही. नाते हे त्याहूनही अधिक असते. अभिमान, आनंद, उत्साह, हवेहवेसे असण्याची भावना असे काही तात्पुरते  सकारात्मक परिणाम केवळ सेक्ससाठी जुळलेल्या वरवरच्या नात्यामुळे जाणवतात. त्याचवेळी पश्चात्ताप, अपेक्षाभंग, गोंधळ, ओशाळलेपण, अपराधीपणा, एकटेपणा आणि आत्मविश्वास कमी होणे यासारखे अनेक नकारात्मक परिणामही दिसतात. तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास, स्वतःची ओळख यांना प्राधान्य दिले पाहिजे. एकापेक्षा अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आपल्या आयुष्यातील या गोष्टींवर कसा परिणाम घडवू शकतात, याचे उत्तर तुमचे तुम्हीच स्वतःला देऊ शकलात की तुम्हाला लक्षात येईल तुम्ही काय करायला हवे आहे. अर्थात तुम्हाला वाटणारे आकर्षण हे नैसर्गिक आहे, त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या