Home /News /lifestyle /

Sexual Wellness : स्वप्नदोष का होतो? यावर काही उपाय आहे का?

Sexual Wellness : स्वप्नदोष का होतो? यावर काही उपाय आहे का?

तुम्हालाही रात्री झोपेत वीर्य बाहेर पडण्याची समस्या उद्भवते आहे? हे सामान्य आहे का? काय आहे याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं?

प्रश्न : स्वप्नदोष का होतो? यावर काही उपाय आहे का? उत्तर : कामुक स्वप्न पडणं आणि स्वप्नदोष (Night Falls) होणं ही सर्वसाधारण समस्या आहे. यामुळे चिंता करण्याची गरज नाही. याचा आपल्या आरोग्याशी किंवा मानसशास्त्राशी काहीही संबंध नाही. वयात येत असताना पुरुष आणि महिला दोघांच्या बाबतीत असं घडतं. पुरुषांमध्ये ही समस्या वीर्यपतन होत असल्यानं मोठ्या प्रमाणात समोर येत असते. वयात येत असल्यामुळे हे होणं नैसर्गिक असून याचा तुमच्या आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे काळजी, चिंता करण्याची गरज नाही. या समस्येवर सध्या काहीही उपाय नाही. पण तुम्ही किशोरवयीन असाल तर झोपताना बेडवर टॉवेल टाकून झोपणं हा यावरील उपाय आहे. रात्री झोपेत वीर्यपतन म्हणजेच स्वप्नदोष होण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्ही योग्य प्रमाणात हस्तमैथुन करून वीर्य बाहेर न टाकणं. कधीकधी तुम्ही खूप दिवस हस्थमैथुन न केल्यानं देखील ते वीर्य स्वप्नदोषाच्या रूपात बाहेर पडत असते. यामुळे शरीरसंबंध आणि हस्तमैथुन करणं यामुळे तुम्हाला यातून सुटका मिळण्यास मदत होऊ शकते. हे वाचा - 5 मिनिटांत वीर्यपतन होणं म्हणजे Premature ejaculation असतं का? जर तुम्ही प्रौढ असाल आणि तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील हार्मोनल असंतुलन होत असल्याचं देखील लक्षण आहे. यामुळे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन यावर उपाय करू शकता. याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे केस गळणं, अंगाचा विचित्र गंध येणं, वजन वाढणं किंवा कमी होणं अशी लक्षणं आढळून येत नसल्यास काळजी करण्याची काहीही गरज नाही.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या