मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

SEXUAL WELLNESS : सेक्सपासून दूर राहणं चुकीचं आहे का?

SEXUAL WELLNESS : सेक्सपासून दूर राहणं चुकीचं आहे का?

'सेक्स ही बाब गमावू किंवा मिळवू शकत नाही. ही बाब लोकांना शिकवण्याचा कोणता मार्ग आहे?'

'सेक्स ही बाब गमावू किंवा मिळवू शकत नाही. ही बाब लोकांना शिकवण्याचा कोणता मार्ग आहे?'

'सेक्स ही बाब गमावू किंवा मिळवू शकत नाही. ही बाब लोकांना शिकवण्याचा कोणता मार्ग आहे?'

प्रश्न :  जेव्हा माझ्या आसपास लैंगिक संबंध ठेवू इच्छिणारी मुलगी येते, तेव्हा मी क्षणार्धात विरुद्ध दिशेनं जातो. सेक्स हे गमावू किंवा मिळवू शकत नाही तसंच ते इतरांबाबत शेअर देखील करू शकत नाही, ही बाब लोकांना शिकवण्याचा कोणता मार्ग आहे? उत्तर :  तुमचं म्हणणं बरोबर आहे. सेक्स म्हणजे काही पैसा नाही. लैंगिक संबंध रोखल्यास लोक जास्त काळ जवळ राहू शकणार नाही, अशी हमी देणं शक्य नाही. दुर्देवानं बऱ्याच महिला, पुरुषांना कधीकधी लैंगिक संबंध रोखण्यात विशेष समाधान मिळते. बऱ्याच जणांना असं वाटण्याचं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी असलेली कल्पना रम्यता आणि विशेषतः स्त्रियांमध्ये लवकर लैंगिक संबंध ठेवणं हे म्हणता येईल. पण हे अत्यंत चुकीचं आहे. सेक्स आणि महिलेच्या इच्छेबाबत असलेली मतं ही धारणा बदलणं म्हणजे समाजाच्या पुरातन कल्पनांना आव्हान देणं होय. याविरोधात माझ्यासारखे लोक दररोज लढा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. चुकीचे लैंगिक संबंध हे बऱ्याचदा रिलेशनशीप संपुष्टात येण्याचं कारण ठरतं. लोक चुकीच्या पद्धतीनं सेक्सला यशस्वी नात्याचा अंतिम बिंदू किंवा कळस मानतात. एखादी रिलेशनशिप कोणत्याही लैंगिक संबंधाशिवाय आनंददायी, यशस्वी किंवा फलदायी होऊ शकते. याउलट अत्यंत अर्थहिन लैंगिकतेपासून सुरू होणारं नातंही सहज यशस्वी, अर्थपूर्ण, भावनिक जिव्हाळ्याचं नाते म्हणून विकसित होऊ शकते. सेक्स हा रिलेशनशिपचा अंतिम टप्पा नाही. पार्टनर्सनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतरही नात्यात बरंच काही घडतं. हे वाचा - Sexual Wellness : 'मला Femdom relationship हवी आहे; सुरुवात कशी करू?' लैंगिक संबंध रोखण्याचे आणखी एक कारण म्हणजे लैंगिक संबंध ही अत्यंत जिव्हाळ्याची कृती असून हा संबंध केवळ विश्वास आणि प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबतच असतो, असा समज असणं होय. जे लोक डेमोसेक्सुअल असतात ते दृढ, प्रेम, भावनिक आणि विश्वासार्ह नातेसंबंध प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत एखाद्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा विचारही करू शकत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर आपणास असं वाटत असेल की लैंगिक संबंध ही अशी गोष्ट आहे की जी आपण अकस्मिकपणे किंवा मजबूत बांधिलकी किंवा भावनिक गुंतवणुकीशिवाय साध्य करू शकत नाही, तर ही बाब पूर्णपणे वैध आहे. आपण असेच आहोत असं ज्यांना वाटत नाही त्यांनी थोडा उलट विचार करावा. आणि अशाच प्रकारची लैंगिकदृष्टया योग्य असणारी दुसरी एखादी व्यक्ती शोधावी. हे वाचा - 'सेक्सची इच्छा होते, प्रत्यक्षात करावासा वाटत नाही; वैवाहिक आयुष्य कसं सांभाळू?' लैंगिक संबंध म्हणजे काही मिळवणं अथवा गमावणं असं नाही. सेक्समुळे रिलेशनशिपमधील आपले मूल्य किंवा आकर्षण कमी होत नाही. आपल्याला नात्यातून काय हवं याचा प्रामाणिक विचार करा, मग भलेही ती भावनिक जवळीक, लैंगिक संबंध किंवा या दोन्ही गोष्टी असू शकतात. आपल्या गरजेला अनुकूल असा पार्टनर शोधा. लबाडपणे वर्तन करून वास्तवातील आपली इच्छा दडपणे हे अनावश्यक असून त्यातून कोणालाही मदत होऊ शकत नाही. त्यामुळे मोकळे व्हा, प्रामाणिक राहा आणि सर्वोत्तम आयुष्य जगा.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या